शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:58 IST

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात वडिलांसाठी त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवणे मोठे आव्हान बनले आहे.

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात वडिलांसाठी त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवणे मोठे आव्हान बनले आहे. मात्र, संशोधनात स्पष्ट झाले की, वडिलांनी मुलांबरोबर घालवलेला वेळ त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या आयुष्यात वडील हे केवळ एक जबाबदार पालक नसून ते मार्गदर्शक आणि सुरक्षित भक्कम आधार असतात. जे वडील आपल्या मुलांच्या लहान-मोठ्या गोष्टींमध्ये सहभागी होतात, त्या मुलांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो, ते भावनिकदृष्ट्या सुदृढ असतात. 

गैरवर्तनापासून दूरवडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मुले चुकीच्या वर्तनापासून दूर राहतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात. समाजात आत्मविश्वासाने वावरण्यात यशस्वी होतात. 

गुणवत्तापूर्ण वेळ, संवाद, सहवास, विश्वास गरजेचासहकुटुंब खेळ, संवाद किंवा अभ्यासात मदत अशा स्वरूपात घालवलेला गुणवत्तापूर्ण वेळ मुलांच्या मेंदूच्या आणि सामाजिक क्षमतेच्या विकासाला चालना देतो. या वेळेत होणारा सकारात्मक संवाद त्यांच्या विचारांना चालना देतो. जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी १० मिनिटे तुमच्या मुलांशी गप्पा मारण्यात घालवा. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत लहान-मोठ्या ट्रिप आयोजित करा. त्यांच्यासोबत खेळा, फिरायला जा आणि त्यांना खरेदीमध्ये मदत करा.

वडिलांचा प्रेमळ स्पर्श देतो मुलांना भावनिक सुरक्षावडिलांचा प्रेमळ स्पर्श आणि पाठिंबा मुलांना भावनिक सुरक्षा प्रदान करतो. त्यामुळे त्यांना टेन्शन येत नाही किंवा ते त्याबाबत मोकळेपणाने बोलू शकतात. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास सहज होतो. वडिलांशी घडणारा संवाद मुलांना आत्मविश्वास देतोच; शिवाय समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल तयार करतो. अभ्यासाकडे गांभीर्याने पाहण्याची सवय लागते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक यशावर  आणि भवितव्यावर होतो. 

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलFather's Dayजागतिक पितृदिन