शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

MHADA च्या सरळ सेवा भरती परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:44 IST

Mhada Recruitment: पात्र उमेदवारांना २१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' व 'क' मधील विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत आयोजित स्पर्धात्मक परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनातर्फे २१ ऑक्टोबर रात्री २३.५९ वाजेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून व परीक्षा शुल्क (Fee) भरण्याची मुदत २२ ऑक्टोबर रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. 

म्हाडा प्रशासनातर्फे सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी १७ सप्टेंबर रोजी  सकाळी ११ वाजेपासून  विहित  अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.       

सदरील पदभरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.

वरील रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक/समांतर/दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी, शर्ती व प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबत सविस्तर तपशील केवळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्याच माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे, असे आवाहन राजकुमार सागर यांनी केले आहे.

म्हाडा प्रशासनातर्फे तर्फे सर्व संबंधित अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे कि म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी कोणतेही आर्थिक अथवा इतर कोणतेही व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारे अर्जदारांची फसवणूक झाल्यास म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही

टॅग्स :mhadaम्हाडा