शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

नर्सिंग क्षेत्र विस्तारतेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 4:04 AM

आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. गरजवंतांचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे, तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते, तिला ‘परिचारिका’ असे ढोबळ मानाने म्हणतात. सामाजिक आरोग्यसेवा पुरविणे, माता-बाल सेवा पुरविणे, नर्सिंगसंबंधीचे प्रशासन, तसेच व्यवस्थापन विषयक कामे पाहणे, रुग्ण व नातेवाइकांना आरोग्य सल्ला देणे अशी कामे त्यांना करावी लागतात. अलीकडे समुपदेशनाचे कार्यही परिचारिका करीत आहेत. हे क्षेत्र तरुणींसाठी जास्त सुरक्षित असल्याचे मानले जाते. केरळ व इतर दक्षिणेतील तरुणींचा या क्षेत्राकडे जास्त ओढा असल्याचे दिसून येते. परदेशातही नोकरीच्या अनेक संधी आता सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. देशातही रुग्णालयांची संख्या वाढते आहे आणि उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे.नर्सिंग ही एक व्यवसायिक अभ्यासक्रमाची दिशा असून, हा एक सेवाभावी व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात रुग्णालयांची संख्या वाढली. त्यामुळे प्रशिक्षित नर्सेसची गरजही वाढली. शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची भरती सातत्याने केली जाते. सुधारगृहे, वृद्धाश्रम, सैन्यदलाची रुग्णालये, शुश्रूषागृहे आणि परदेशातही नर्सिंग क्षेत्रात नोकरी-करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन नर्सिंग कौन्सिल आदी ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी व्यक्तिगत परिचारिकांनाही मोठी मागणी आहे.मात्र, प्रशिक्षित परिचारिकांची गरज आणि उपलब्धता याचे आज व्यस्त प्रमाण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीच्या संधी लगेचच उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रात पीएच.डी.सुद्धा करण्याची सुविधा काही संस्थांमध्ये आहे. असा उच्च अभ्यासक्रम केल्यावर, नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करण्याची संधी मिळू शकते.संधी -प्रशिक्षित, पण कमी अनुभव असलेल्या रुग्णपरिचारिकांना मासिक २० हजारांपर्यंत वेतन प्राप्ती होऊ शकते. कामाच्या पुरेशा अनुभवानंतर हीच रक्कम वाढते यात दुमत नाही. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, अरब देशांत उपलब्ध असणाºया नोकºयांत वेतनाची ही आकडेवारी आणखी जास्त असते. अनुभवी आणि कुशल रुग्णसेवक/सेविकांना परदेशात फार मोठी मागणी आहे. भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची गरज भागविली जाते. आकर्षक कमाई आणि उत्तम राहणीमान, यासाठी अनुभवी परिचारिका परदेशातील नोकरी स्वीकारण्यास उत्सुक असतात, परंतु यामुळे आपल्या देशात मात्र अनुभवी नर्सेसची नेहमी चणचण भासते. तेव्हा जर तुम्हाला दुसºयाला मदत करणे आवडत असेल, दुसºयाची सेवा करण्याचा मानवतावादी दृष्टीकोन आणि उत्तम निरीक्षण शक्ती असेल, तुमची शारीरिक व मानसिक मेहनत घेण्याची तयारी असेल, तर रुग्णसेवेतील करिअर संधी स्वीकारायला काहीच हरकत नाही.पदवी अभ्यासक्रमबी.एस्सी. (आॅनर्स - नर्सिंग)बी.एस्सी. (नर्सिंग -पोस्ट सर्टिफिकेट)जीएनएम (जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी)एम.एस्सी (गायनेकॉलॉजी नर्सिंग)एम.एस्सी. (पेडिअ‍ॅट्रिक नर्सिंग)पदविका अभ्यासक्रमहेल्थ असिस्टंट (डी.एच.ए.)होम नर्सिंग (डी.एच.एन.)नर्सिंग एज्युकेशन (डी.ई.ए.)क्रिटिकल केअर नर्सिंग (पदव्युत्तर पदविका)इमर्जन्सी नर्सिंग (पदव्युत्तर पदविका)निओ नटाल नर्सिंग (पदव्युत्तर पदविका)पेडिअ‍ॅट्रिक क्रिटिकल केअर (पदव्युत्तर पदविका)प्रमाणपत्र अभ्यासक्रमआॅक्झिलरी नर्स अँड मिडवाइफआयुर्वेदिक नर्सिंगकेअर वेस्ट मॅनेजमेंटहोम नर्सिंग

टॅग्स :Medicalवैद्यकीयnewsबातम्या