इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:10 AM2019-01-29T11:10:59+5:302019-01-29T11:18:33+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द. समानार्थी शब्दांचे वाचन वारंवार असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण वाचन असायला हवे. पाठ्यपुस्तकातीलही विविध शब्दांचे अर्थ माहीत असावेत.

Etc. 5th scholarship examination, subject- Marathi component- Master on Vocabulary. Sub-Synonyms | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- लेख क्र. 25विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द

महत्त्वाचे मुद्दे -

  • समानार्थी शब्दांचे वाचन वारंवार असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण वाचन असायला हवे. पाठ्यपुस्तकातीलही विविध शब्दांचे अर्थ माहीत असावेत.
     
  • नमुना प्रश्न :-


(1) पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? (2017)
(1) झणी-लवकर (2) अलगत- हळुवार (3) कवन- कविता (4) वेल- कुंज
स्पष्टीकरण- पर्यायातील वेल या शब्दाला कुंज समानार्थी शब्द नाही. कुंज हा समूहदर्शक शब्द आहे.

(2) गटात न बसणारा शब्द ओळखा. (2018)
(1) तुरंग (2) अश्व (3) वारू (4) कुंजर
स्पष्टीकरण - घोडा-तुरंग, अश्व, वारू,
हस्ती- कुंजर
म्हणून पर्याय क्र. - 4 बरोबर

(3) समानार्थी अर्थी शब्द अचूक शोधा.
सूर्य- -
(1) मार्तंड (2) शशी (3) सोम (4) इंदू
स्पष्टीकरण -सूर्य- मार्तंड, चंद्र - शशी, सोम, इंदू
म्हणून पर्याय क्र. 1 हा सूर्याला समानार्थी शब्द आहे.

(4) जलद या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?
(1) मेघ (2) अंबुद (3) पाणी (4) पयोद
स्पष्टीकरण-
जलद- मेघ, अंबुद, पयोद, ढग
पाणी हा वेगळा पर्याय येईल.

(5) चुकीची जोडी निवडा
(1) क्षीर-दूध (2) समुद्र- पयोधी (3) क्षेम- कुशल (4) शर- शीर
स्पष्टीकरण - पर्याय क्र. 4 मध्ये
शर-बाण व शीर- दूध
म्हणून पर्याय क्र. 4 वेगळा.

नमुना प्रश्न :

  •  पुढील शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

(1) कासार -
(1) डोंगर (2) तलाव (3) थंड (4) नदी

(2) वारी -
(1) पाणी (2) पर्वत (3) चालणे (4) पती

(3) ईश्वर-
(1) सूर (2) सुर (3) असुर (4) यापैकी नाही

(4) शैल-
(1) थंड (2) पर्वत (3) डोंगर (4) जमीन

(5) कावळा-
(1) हेम (2) पक्षी (3) वायस (4) मयूर

(6) सान या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय शोधा.
(1) मोठा (2) लहान (3) धाडस (4) लक्ष

(7) गटात न बसणारा शब्द शोधा.
(1) ह्य (2) अश्व (3) वारू (4) वारा

(8) गटातील वेगळा शब्द निवडा.
(1) हेम (2) सोने (3) कांचन (4) सुवर्णा

(9) गटातील वेगळी जोडी शोधा.
(1) भाल-मस्तक (2) घर- गेह (3) गड- तट (4) कमळ- पद्मा

(10) दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द शोधा - मुलगी
(1) मुलगा (2) कन्या (3) आई (4) पुत्र

(11) कर्ण : कान तसे चंद्र : ?
(1) हेम (2) इंदू (3) पंकज (4) सविता

(12) सूर्य : सविता तसे चंद्र : ?
(1) कौमुदी (2) इंदू (3) लक्ष्मी (4) पदमा

(13) गटातील चुकीची जोडी कोणती?
(1) व्रण-क्षत (2) वंदन- प्रणिपात (3) समुद्र- जलधी (4) साप- मही

(14) चुकीचा पर्याय निवडा
(1) तनया (2) तन (3) सुता (4) लेक

उत्तरसूची :-
(1) 2 (2) 1 (3) 2 (4) 2 (5) 3 (6) 2 (7) 4 (8) 4 (9) 4 (10) 2 (11) 2 (12) 2 (13) 4 (14) 4

 

 

Web Title: Etc. 5th scholarship examination, subject- Marathi component- Master on Vocabulary. Sub-Synonyms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.