शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

देखण्या दातांचे हट के करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:33 IST

परदेशात जाऊन करिअर करू शकता.

डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याचे काम करावे लागते. डेन्टिस्टला मदत करताना दातांची स्वच्छता करणे, त्याचे एक्स-रे घेणे, तसेच उपकरणे स्टेरलाइज करणे, डेन्टल क्लिनिंग, स्केलिंग, पॉलिशिंग आणि डेन्टल इम्प्रेशन अशी कामे डेन्टल हायजिनिस्टला करावी लागतात. डेन्टल हायजिनिस्ट हा रुग्णाची मेडिकल हिस्ट्री तपासतो तसेच रक्तदाब आणि अन्य गोष्टींचीही तपासणी करतो. आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

दातांचे आरोग्य नीट न राखल्यामुळे दात, दाढ किडतात. या किडलेल्या दाढा काढून त्या ठिकाणी दुसऱ्या दाढा बसविणे, तसेच रूट कॅनलसारख्या शस्त्रक्रिया करून दातांचे आरोग्य कायम राखण्याचे प्रयत्न करणे, अशी कामे दंतवैद्यकाला करावी लागतात. आपल्या बिनधास्त जीवनशैलीमुळे दातांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. दातदुखी चालू झाल्यावर किंवा दाढदुखी चालू झाल्यावर अनेक जण दंतवैद्यकाचा रस्ता धरतात. जेव्हा दुखणे हाताबाहेर जाते, त्यावेळी डेन्टिस्टचा सल्ला घेण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नसतो.

डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याबरोबरच अनेक कामेही करावी लागतात. मुख्य म्हणजे रुग्णाबरोबर संवाद साधून त्याला दाढ काढताना वा अन्य शस्त्रक्रिया करताना वेदना जाणवणार नाहीत, याची दक्षता डेन्टल हायजिनिस्टला घ्यावी लागते. डेन्टल हायजिनिस्ट हा डेन्टिस्टबरोबर रुग्णालाही मदत करत असतो.

मागील काही वर्षांत दंतविकारांचे प्रमाण वाढले आहे, यामागे विविध कारणे आहेत. या आजारांमुळे दंतवैद्यक क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होतोय. या शाखेतील वेगळ्या वाटेवरील करिअर हा तरुण पिढीसमोर नवा पर्याय आहे. दंतवैद्यकशास्त्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना कायमच डेन्टल हायजिनिस्टचे सहकार्य लागते. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

स्वत:चा व्यवसाय करू शकता

डेन्टल हायजिनिस्ट या पदावर काम करण्याकरिता अनेक रुग्णालयांबरोबरच खासगी डॉक्टरांबरोबरही काम करता येते. नर्सिंग होम, रिसर्च डिपार्टमेंट, औषध कंपन्या येथेही काम करण्याची संधी आहे. कॉस्मॅटिक डेन्टिस्ट बनून स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो. डेन्टल कौन्सिलिंग ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याशी संबंधित महाविद्यालयांत  अभ्यासक्रम शिकविला जातो. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे दातांच्या आरोग्याविषयी आता जागरूकता वाढतेय, येणाऱ्या काळात आपल्याकडेही या क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसेल.

कोणत्या संधी?

डेंटल हायजिनिस्टना सहसा ९ ते ५ या वेळेतील जॉब मिळतो. कामाचा दबाव आणि तणाव समान आहेत. दंत महाविद्यालयांव्यतिरिक्त खासगी दंत चिकित्सालय किंवा रुग्णालयात नोकरी मिळते. ते डेंटल सर्जरी असिस्टंट म्हणूनही काम करू शकतात. सार्वजनिक आरोग्य प्रशासनात नोकरीसाठीही अर्ज करू शकतात. ते डेंटल उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीतही करिअर करू शकतात.

किती मिळतो पगार? 

फ्रेशर म्हणून डेंटल हायजिनिस्टला १५ ते २५ हजार रुपये पगार मिळतो. अनुभवाने, स्थिती आणि पैसा दोन्ही वाढू लागतात. पाश्चात्त्य देशांमध्ये हा एक प्रस्थापित व्यवसाय आहे, म्हणून भारतापेक्षा मागणी जास्त आहे. परदेशात जाऊन करिअर करू शकता.

 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन