शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:08 IST

आजघडीला पारंपरिक व्यापाराबरोबरच ऑनलाइन नेटवरील  म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा वापर वेगाने वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाचा बदलता आविष्कार आणि डिजिटल उत्पादने ...

आजघडीला पारंपरिक व्यापाराबरोबरच ऑनलाइन नेटवरील  म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा वापर वेगाने वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाचा बदलता आविष्कार आणि डिजिटल उत्पादने वापरण्याची पद्धत यानुसारही डिजिटल ॲडर्व्हर्टायझिंगचे रंगरूप पालटते आहे. पूर्वी वेबसाइट असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते, आता ती एक आवश्यक; परंतु, रोजच्या दिसण्यातली बाब झाली आहे. याउलट सोशल नेटवर्किंग साइटस्वर कंपनीचे पान असणे ही सध्याची ‘इन थिंग’ आहे.

एकंदरीने पाहता डिजिटल माध्यमांनी मार्केटिंग आणि जाहिरातीचे एक अतिविशाल व अनोखे दालन उघडले आहे यात वादच नाही. माहितीच्या विस्फोटामुळे ग्राहकवर्गही अधिक जागरूक झाला आहे आणि स्वत:च्या गरजांनुसार असलेले  उत्पादन शोधण्यात पटाईतही! यामुळे मार्केटिंग कंपन्यांना सर्वच आघाड्यांवर सतत लक्ष ठेवून लवचिक धोरणे ठेवणे भाग पडते आहे. ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्याक्रमांनुसार जाहिरातदारही योग्य प्रकारे सेवा पुरवून स्पर्धेत टिकून राहत आहेत. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांकडे हवी ती वस्तू उपलब्ध होत आहे. वाढत्या व्यापार विस्तारामुळे  क्षेत्रात करिअर करण्याचीही संधी वाढली आहे. 

असंख्य करिअर पर्याय उपलब्ध n आजच्या जमान्यात जगातील कोट्यवधी जण इंटरनेटशी जोडले गेले आहेत व ही संख्या दररोज वाढत चालली आहे. n कायम नेटवर  ऑनलाइन असलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून अनेक उत्पादने नवीन व्यूहरचना आखत आहेत. n त्यामुळे डिजिटल मार्केटिंगसंबंधी असंख्य करिअर पर्याय उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमांचा समावेशडिजिटल मार्केटिंगमध्ये चांगले करिअर घडवायचे असेल तर  डिजिटल मार्केटींगमध्ये एमबीए केले पाहिजे. एमबीए इन डिजिटल मार्केटिंग थोडे वेगळे आहे. सर्वसाधारण एमबीएमध्ये सर्व प्रकारच्या मार्केटिंगबद्दल शिकविले जाते; पण डिजिटल मार्केटिंगमध्ये केवळ डिजिटल मार्केटिंगच शिकविले जाते. यात वेबसाइट, सोशल नेटवर्क, गुगल जाहिराती, सर्च रिझल्ट्स इ. विषयी शिकविले जातात.

वेतन किती मिळू शकते?डिजिटल मार्केटिंगचा कोर्स घेतल्यानंतर  सुरुवातीला चार ते पाच लाखांचे पॅकेज मिळते, ते अनुभवाने वाढते. अनेक अनुभवी डिजिटल मार्केटींग मॅनेजर महिन्याला दाेन ते २.५ लाख रुपयेही कमावितात.

परदेशी कंपन्यांमध्येही नोकरीच्या संधीया नोकरीसाठी कोणत्याही मर्यादा नाहीत. इंटरनेटद्वारे व्यवसाय करणाऱ्या लाखो कंपन्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याच जणांना डिजिटल मार्केटींग मॅनेजरची आवश्यकता असते. यात डिजिटल विपणन विश्लेषक, वरिष्ठ डिजिटल विश्लेषक, डिजिटल उत्पादन विश्लेषक, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी, डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक, वरिष्ठ डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक, डिजिटल मार्केटिंग प्रमुख, डिजिटल मार्केटिंगतज्ज्ञ, डिजिटल कॅम्पेन लीड संधींना मागणी आहे.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन