शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Job Alert! आयटी क्षेत्रात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर; 'ही' कंपनी करणार बंपर भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:15 IST

Capgemini to Hire 60000 Employees in India : कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षी भारतात जवळपास 60,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. ही संख्या 2021 पेक्षा जास्त आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही आयटी क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्रान्सची आयटी कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) यावर्षी भारतात बंपर भरती (Bumper Hiring in India) करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षी भारतात जवळपास 60,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. ही संख्या 2021 पेक्षा जास्त आहे.

कंपनीचे सीईओ (CEO) यश्विन यार्डी यांचे म्हणणे आहे की, डिजिटल आधारित उपायांची मागणी वाढत आहे. आमच्याजवळ जागतिक स्तरावर जवळपास 3.25 लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्मे भारतात आहेत. नवीन नियुक्त्यांमध्ये प्रेशर हायरिंग आणि लॅटरल टॅलेंटच्या स्वरूपात असतील. यामध्ये  5G आणि क्वांटम सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष दिले जाईल.

कॅपजेमिनीने गेल्या वर्षी एरिक्सन (Ericsson) सोबत भागीदारी करून भारतात 5G लॅब लाँच केली. याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे म्हणत  5G उद्योगाला अधिक सेवा देण्यासाठी आम्ही आता काही जागतिक आणि भारतीय सर्विस प्रोवाइडर्ससोबत काम करत आहोत, असे यश्विन यार्डी यांनी सांगितले.

2021 मध्ये कॅपजेमिनीने भारतात चांगली कामगिरी केली. येत्या काही दिवसांत कंपनीचा आउटलूक अधिक चांगला असणार आहे, ज्यामुळे हायरिंग ड्राईव्हला चालना मिळाली आहे. हायरिंगला चालना देण्यासाठी आम्ही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही जात आहोत, असे यश्विन यार्डी यांनी म्हटले आहे.

'भारत मोठी भूमिका बजावेल'गेल्या महिन्यात कॅपजेमिनी ग्रुपचे सीईओ ऐमान इज्जत यांनी सांगितले होते की, कंपनीच्या पुढील कामकाजाचे व्यवस्थापन करण्यात भारत मोठी भूमिका बजावेल. हे भारतातील उदयोन्मुख लीडर्सकडे देखील लक्ष देईल, जे जागतिक स्तरावर संघांचे नेतृत्व करू शकतात. Quantum, 5G आणि Metaverse सारख्या उदयोन्मुख टेक्नॉलॉजीने पुढे जाणे अपेक्षित आहे.

टॅग्स :businessव्यवसायjobनोकरी