शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

BSF Recruitment 2021: १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, सुरक्षा दलात निघाली मोठी भरती; तगडा पगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:02 IST

BSF Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

BSF Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.  सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कॉन्स्टेबलपासून ते मॅकेनिक अशा विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीचं अधिकृत पत्रक देखील जाहीर झालं असून एकूण ११० जागांवर भरती केली जाणार आहे. या जागा ग्रूप बी आणि ग्रूप सी अंतर्गत असणार आहेत. (BSF Recruitment 2021 Vacancy for Technician Constable and various Post)

नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये १५०० जागांवर भरती; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या...

बीएसएफकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार नोकरीसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जून २०२१ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच bsf.gov.in येथे भेट द्यावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरुपात होणार असल्यानं उमेदवारांना वेबसाइटच्याच माध्यमातून अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जुलै २०२१ पर्यंत असणार आहे. 

नोकरीची संपूर्ण माहिती

  • एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- १ जागा
  • एएसआय प्रयोगशाळा टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- २८ जागा
  • सीटी (वॉर्ड बॉय/ वॉर्ड गर्ल/ आया) ग्रूप सी पोस्ट- ९ जागा
  • एचसी (वेटरिनरी) ग्रूप सी पोस्ट- २० जागा
  • कॉन्स्टेबल (कॅनलमॅन) ग्रूप सी पोस्ट- १५ जागा
  • एसआय (स्टाफ नर्स)- ३७ जागा

पात्रता काय?स्टाफ नर्सपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं इयत्ता १२ वी पर्यंतचं शिक्षण व सोबतच नर्सिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणं बंधनकारक आहे. ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन पदासाठी विज्ञान शाखेतून इयत्ता १२ उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. याशिवाय संबंधित उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त ऑपरेशन थिएटरचं प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं असणार आहे. प्रयोगशाळा टेक्निशिअनसाठी उमेदवाराचं चिकित्सा प्रयोगशाळा प्राद्योगिकीकरणात डिप्लोमा केलेला असणंर गरजेचं आहे. तर कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराचं किमान इयत्ता १० वीपर्यंतंचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे. 

वयोमर्यादा किती?उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक तर ३० वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. यासंबंधिची अधिक माहिती इच्छुक उमेदवार संकेतस्थळाला भेट देऊन जाणून घेऊ शकतात. 

वेतन किती मिळणार?

  • एसआय (स्टाफ नर्स)- ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांपर्यंत 
  • एसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- २९,२०० ते ९२,३०० रुपये
  • एएसआय लॅब (प्रयोगशाळा) टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- २९,२०० ते ९३,३०० रुपये
  • सीटी (वॉर्ड बॉय/ वॉर्ड गर्ल/आया) ग्रूप सी पोस्ट- २१,७०० ते ६९,१०० रुपये
  • एचसी (पशु चिकित्सा) ग्रूप सी पोस्ट- २५,५०० ते ८१,१०० रुपये
  • कॉन्स्टेबल (कॅनलमॅन) ग्रूप सी पोस्ट- २१,७०० ते ६९,१०० रुपये.
टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन