शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
3
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
4
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
5
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
6
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
7
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
8
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
9
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
10
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
11
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
12
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
13
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
14
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
16
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
17
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
18
Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
19
रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
20
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

'या' सरकारी कंपनीत नोकरीची संधी; फ्रेशर्सही करू शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 10:09 IST

Government Jobs: कंपनीने एकूण 150 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली :  तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील प्रसिद्ध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रिसिटी लिमिटेडने (BHEL) इंजिनिअर ट्रेनी आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. BHEL ने आपल्या नवी दिल्ली कॉर्पोरेट कार्यालयामार्फत ही भरती केली आहे. कंपनीने एकूण 150 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

BHEL च्या जाहिरात क्रमांक (01/2022) नुसार, कंपनीने एकूण 150 पदांसाठी भरतीसाठी नोटीस जारी केली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, आयटी/कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि मेटलर्जी इंजिनिअरिंग या पदांसाठी एकूण 120  इंजिनिअर ट्रेनी म्हणून भरती केली जाणार आहे. याशिवाय, वित्त आणि मानव संसाधन विभागातील एकूण 30 पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे. या पदांवर फ्रेशर्सनाही संधी दिली जाईल.

या पदांसाठी अर्ज करण्‍यासाठी, उमेदवार भरती जाहिरात BHEL च्या अधिकृत वेबसाइट careers.bhel.in वरून डाउनलोड करू शकतात आणि थेट ऑनलाइन अर्ज पेज जाऊ शकतात. पहिल्यांदा उमेदवाराला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 800 रुपये शुल्क भरावे लागतील. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 300 रुपये शुक्ल भरावे लागेल. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरू शकतात. या पदांसाठी 13 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे.

कोण करू शकतं अर्ज?BHEL च्या जाहिरातीनुसार, इंजिनिअर ट्रेनीच्या 120 जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदवीधर (BE/B.Tech) पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचवेळी, वित्त विभागातील  एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर असावा. यासोबत उमेदवाराने सीए किंवा सीडब्ल्यूए परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, एक्झिक्युटिव्ह ट्रेनीपदासाठी दोन वर्षांची पूर्णवेळ पदवी किंवा एचआर किंवा पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन किंवा सोशल वर्कमध्ये डिप्लोमा असलेले पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय सप्टेंबर 2022 पर्यंत 27/29 वर्षांपेक्षा (पदांनुसार वेगवेगळे) जास्त नसावे.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन