शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर; 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 13:27 IST

BARC Stipendiary Trainee Recruitment : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना barc.gov.in या BARC Recruitmentच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सध्या मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यावेळी दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांना नोकऱ्या देण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भात 4300 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना barc.gov.in या BARC Recruitmentच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. BARC द्वारे जारी करण्यात आलेल्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 24 एप्रिल 2023 रोजी सुरू होईल. यामध्ये फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, ज्यासाठी 22 मे 2023 पर्यंत संधी असेल. मात्र, या रिक्त जागांसाठी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

भाभा अणुसंशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनीसह एकूण 4374 पदांवर भरती करण्यात येणार असून यामध्ये श्रेणी 1 मधील 1216 पदांवर आणि 2946 श्रेणी 2 मधील स्टायपेंडरी ट्रेनी पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर टेक्निकल ऑफिसर पदाच्या 181 जागांसाठी भरती होणार आहे. इतर अनेक पदांसाठी जागा ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचे डिटेल्स अधिसूचनेत पाहिले जाऊ शकतात.

या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी शुल्क जमा करणे फार महत्वाचे आहे. यामध्ये पदांनुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, टेक्निकल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये जमा करावे लागतील. सायंटिफिक असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क 150 रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय, तुम्ही प्रशिक्षणार्थीसाठी 100 रुपयांमध्ये अर्ज करू शकाल. एससी, एसटीसाठी मोफत अर्ज करण्याचा ऑप्शन आहे.

कोण करू शकतो अर्ज?स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी एक मध्ये अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेशी संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा करण्यास सांगितले आहे. त्याच श्रेणी दोनसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तर पदानुसार 12वी पासची पात्रताही ठेवण्यात आली आहे. तुम्ही अधिसूचनेत पात्रता आणि वयोमर्यादेचे डिटेल्स पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईनअर्ज सुरु होण्याची तारीख : 24 एप्रिल 2023]अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2023 (11:59 PM)अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in 

टॅग्स :jobनोकरी