शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' 500 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 10:44 IST

Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची आजची म्हणजेच 22 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे. 

सरकारी बँकांमध्येनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची आजची म्हणजेच 22 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे स्केल 2 आणि स्केल 3 मध्ये जनरलिस्ट ऑफिसरच्या भरतीसाठी पुण्यातील मुख्यालय आणि देशभरातील शाखांद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया आज संपणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते बँकेच्या अधिकृत वेबसाइट, bankofmaharashtra.in वर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

अर्ज प्रक्रियेअंतर्गत, इच्छुक उमेदवारांना आज 1180 रुपये विहित शुल्क देखील भरावे लागेल. उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल. दरम्यान, त्यानंतर उमेदवार  9 मार्चपर्यंत त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र अर्ज 2022 प्रिंट करू शकतील. तसेच, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 

शैक्षणिक पात्रता:Generalist Officer (Scale-II) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. 

Generalist Officer (Scale-III): अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल 

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्यास सुरुवात : 5 फेब्रुवारी 2022अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022 परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022परीक्षेची तारीख : 12 मार्च 2022निकालाची तारीख : अद्याप जाहीर नाही 

अर्ज शुल्क :सामान्य/ओबीसी प्रवर्ग : 1180 रुपये आर्थिकदृष्ट्या मागास : 1180 रुपये अनुसूचित जाती/ जमाती : 118 रुपयेमहिला/दिव्यांग : निशुल्क 

वयोमर्यादा :किमान वय: 25 वर्षेकमाल वय: 35 वर्षे (स्केल-II)कमाल वय: 38 वर्षे (स्केल-III)

टॅग्स :bankबँकjobनोकरीBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र