Bank jobs 2023 : 'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 05:57 PM2023-02-09T17:57:23+5:302023-02-09T18:12:25+5:30

Bank jobs 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवार शोधत आहे.

bank jobs 2023 sbi recruitment indian bank so recruitment central bank of india recruitment govt jobs | Bank jobs 2023 : 'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज

Bank jobs 2023 : 'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज

googlenewsNext

नवी दिल्ली : बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी यंदा नव्या संधी समोर येत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत काही बँकांनीनोकरीसाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये एसबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकमध्ये नोकरीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवार शोधत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 9 फेब्रुवारी 2023 आहे. या पदांच्या नोकरीसाठी नियुक्त उमेदवारांना पगार महिन्याला लाखो रुपये मिळू शकतो.

Indian Bank SO Recruitment 2023
याचबरोबर इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या  (SO) पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार भारतीय बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, या पदासांसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होईल आणि या बँकेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

Central Bank of India Recruitment
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मुख्य व्यवस्थापक स्केल IV (मेन स्ट्रीम) आणि वरिष्ठ व्यवस्थापक स्केल III (मेन स्ट्रीम) या पदांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र, उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीमधील रिक्त जागांसाठी 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
 

Web Title: bank jobs 2023 sbi recruitment indian bank so recruitment central bank of india recruitment govt jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.