शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत नोकरी करण्याची संधी, पीओसह विविध पदांवर भरती, आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:59 IST

IBPS RRB Notification 2023: उमेदवार IBPS ऑनलाइन ibps.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) विविध सरकारी बँकांमध्ये लिपिक पीओसह अनेक पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज 1 जून 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवार IBPS ऑनलाइन ibps.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

दरम्यान, उमेदवार 21 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/PO (असिस्टंट मॅनेजर) , ऑफिसर स्केल 2 (व्यवस्थापक) आणि ऑफिस स्केल 3 (वरिष्ठ मॅनेजर) या पदांसाठी एकूण 8612 पदांची भरती करायची आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या विविध ग्रामीण बँकांमध्ये जातील.

'या' पदांवर केली जाणार भरती ऑफिस असिस्टंट – 5538 पदेअधिकारी स्केल I – 2485 पदेऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) – 60 पदेऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) – 3 पदेऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) – 8 पदेऑफिसर स्केल II (कायदा) – 24 पदेऑफिसर स्केल II (CA) – 18 पदेऑफिसर स्केल II (IT) – 68 पदेऑफिसर स्केल II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 पदेअधिकारी स्केल III – 73 पदे

कोण करू शकतं अर्ज?या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. वयोमर्यादाही वेगळी ठरवण्यात आली आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहितीसाठी उमेदवार जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात.

चार टप्प्यात होईल नियुक्ती...या सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल.

अशा प्रकारे करा अर्ज...- IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.-  होम पेजवर दिलेल्या संबंधित पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.- मेल आयडी इत्यादी आवश्यक डिटेल्स प्रविष्ट करून रजिस्ट्रेशन करा.- आता अर्ज प्रक्रिया सुरू करा आणि डाक्युमेंट्स अपलोड करा.- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

टॅग्स :bankबँकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन