भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवी दिल्ली येथील त्यांच्या कॉर्पोरेट मुख्यालयात वरिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत वरिष्ठ सल्लागार (प्लॅनिंग) आणि वरिष्ठ सल्लागार (ऑपरेशन्स) या दोन प्रमुख पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा दीड लाख रुपये पगार मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट आहे.
या भरती अंतर्गत वरिष्ठ सल्लागार (प्लॅनिंग) पदांसाठी एकूण ६ पदे भरली जाणार आहेत. वरिष्ठ सल्लागार (ऑपरेशन्स) पदांसाठी एकूण ४ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय, ४५ वर्षे असावे.
वरिष्ठ सल्लागार (प्लॅनिंग): पात्रतासिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी आणि एमबीए (कोणतेही स्पेशलायझेशन). आयआयटी किंवा एनआयटीमधून अभियांत्रिकी पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराला पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या देखरेख, अंमलबजावणी किंवा एमआयएस डेव्हलमेन्ट ८-१० वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वरिष्ठ सल्लागार (ऑपरेशन्स): पात्रताअभियांत्रिकी, सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा ऑपरेशन्स रिसर्चमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवाराला डेटा विश्लेषण आणि अहवाल किंवा अधिकृत उत्तरे तयार करण्यात ८-१० वर्षाचा अनुभव असावा.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया नोकरी: अर्ज प्रक्रियापात्र उमेदवारांनी २१ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान aai.aero किंवा edcilindia.co.in द्वारे त्यांचे अर्ज सादर करावेत. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया नोकरी: निवड प्रक्रियाउमेदवाराची निवड शैक्षणिक पात्रता, संबंधित अनुभव, कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत यावर आधारित असेल. फक्त निवडलेल्या उमेदवारांशी ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल.