शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘५जी’नंतर देशातील नाेकरभरतीलाही ‘स्पीड’; टेलिकाॅम क्षेत्रात नाेकरभरतीत माेठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:56 IST

माॅन्स्टर एम्प्लाॅयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरमधील आकडेवारीतून हे माहिती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम आणि ५जी सेवेच्या लाॅंचिंगमुळे देशात राेजगाराबाबत पाॅझिटिव्ह वातावरणाची निर्मिती झाली आहे. कंपन्यांमध्ये नाेकर भरतीला वेग आला आहे. विशेषत: टेलिकाॅम क्षेत्रातील भरतीमध्ये सुमारे १३ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयात आणि निर्यात क्षेत्रात सर्वाधिक २८ टक्के नाेकर भरती वाढली आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे सकारात्मक संकेत आहेत.

माॅन्स्टर एम्प्लाॅयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरमधील आकडेवारीतून हे माहिती मिळाली आहे. ऑक्टाेबरमध्ये देशात ५जी सेवेचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. सुरुवातीला काही निवडक शहरांमध्येच ५जी उपलब्ध आहे. मात्र, दिवाळीपर्यंत आणखी काही शहरांमध्ये विस्तार हाेणार आहे, तर पुढील वर्षी देशातील बहुतांश शहरांमध्ये ५जी माेबाईल सेवा उपलब्ध असेल. ५जी सेवेचा विस्तार पाहता टेलिकाॅम क्षेत्रात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. टेलिकाॅम कंपन्या त्यांच्या डेटा सेंटर्सच्या क्षमतेत वाढ करणार आहेत. याशिवाय विशेषज्ञता असलेल्या पदांवर या कंपन्यांमध्ये भरती सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.

उत्पादन आणि रेटेल सेक्टरमध्ये वाढसणासुदीच्या काळात उत्पादन आणि रिटेल सेक्टरमध्ये प्रत्येकी ५ टक्के नाेकर भरती वाढली आहे.ॲपेरल, वस्त्राेद्याेग आणि दागिन्यांच्या क्षेत्रात ११ टक्के वाढ झाली आहे.

आयात आणि निर्यात क्षेत्र आघाडीवरकाेराेनानंतर कंपन्यांनी विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच यावर्षी सणासुदीचा हंगाम जाेरात आहे. त्यामुळे या क्षेत्रात सर्वाधिक २८ टक्के नाेकर भरती झाली.

टॅग्स :jobनोकरी