AAI JE Recruitment 2025 : पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची नवीन संधी आली आहे, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ही भरती ९७६ पदांसाठी केली जाणार आहे.
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
या पदांसाठी भरती
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर)- ११ पदे
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-सिव्हिल)- १९९ पदे
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल)- २०८ पदे
कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान)-३१ पदे
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)- ५२७ पदे
पात्रता-
उमेदवारांचे कमाल वय २७ वर्षे असले पाहिजे, उमेदवारांचे वय २७ सप्टेंबर २०२५ च्या आधारे मोजले जाईल.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
उमेदवारांकडे आर्किटेक्चर किंवा संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा एमसीए पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड GATE स्कोअरच्या आधारे केली जाईल.
पगार
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,००० रुपये – ३% – १४,०००० रुपये मिळतील.
अर्ज शुल्क-
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला, अनुसूचित जाती, जमाती आणि माजी सैनिक आणि एएआयमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
भरतीसाठी अर्ज असा करा
आधी, उमेदवाराला aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर, तुम्हाला होम पेजवर दिलेल्या अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुम्हाला लॉग इन करावे लागेल आणि अर्ज भरावा लागेल.
अर्ज फॉर्म तपासा आणि त्यानंतर तुमची फी भरा. यानंतर, अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.