शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांना 'एनओसी' देण्याचे जिल्हा परिषदेचे अधिकार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:29 IST

Khamgaon News जिल्हा परिषदेकडे असलेली अनेक कामे जलसंधारण विभागाकडून करण्याचा मार्ग मोकळा झाला.

- सदानंद सिरसाट खामगाव : छोट्या प्रकल्पातून सिंचनाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा परिषदांच्या लघुसिंचन विभागाकडे असलेल्या ० ते १०० हेक्टर मयार्देपर्यंतच्या प्रकल्पांची निर्मिती करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाची नाहरकत घेण्याची अट मृद व जलसंधारण विभागाने १२  ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकाद्वारे काढली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेकडे असलेली अनेक कामे जलसंधारण विभागाकडून करण्याचा मार्ग मोकळा झाला. आधी ग्रामीण रस्ते त्यानंतर सिंचन प्रकल्पांची कामे जिल्हा परिषदांकडून वळती करण्याचा प्रकार घडत आहे.  ग्रामीण भागांमध्ये जलसिंचन योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जातो. तसेच राज्यस्तरावरूनही निधी दिला जातो. राज्यस्तराच्या निधीतून ० ते १०० हेक्टर क्षमतेची कामे करण्यासाठी विलंब होत होता. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचा ठराव, जिल्हा नियोजन आराखड्यात योजना समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र, तसेच जलसंधारण महामंडल औरंगाबाद यांचे प्रमाणपत्र घेण्याची अट होती. आता जलसंधारण विभागाने या तीनही अटी काढून टाकल्या आहेत. त्यामुळे राज्य स्तरावरून प्राप्त होणाऱ्या निधीतून ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेची कामे थेट केली जाणार आहे. त्यातून जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेली अनेक कामे जलसंधारण विभागाकडूनच केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकाराने जिल्हा परिषदांचा लघुसिंचन विभाग बिनकामाचाही ठरणार आहे. 

आधी रस्ते आता सिंचन प्रकल्पाचा लचका

शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेले अनेक रस्ते केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या बांधकाम विभागांच्या निधीमध्ये कपात होत आहे. आता सिंचन प्रकल्पांचेही तेच झाल्यास लघुसिंचन विभागाला मिळणारा निधीही कमीच होणार आहे.   

टॅग्स :khamgaonखामगावIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प