शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:05 IST

Zilla Parishad teacher transfers canceled : यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याने शिक्षकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : गेल्या दोन वर्षांपासून बदल्यांची प्रक्रियाच न झाल्याने दुर्गम गावातील अनेक शिक्षक यंदा बदली प्रक्रियेकडे आस लावून बसले होते. मात्र, यावर्षी बदली प्रक्रिया रद्द झाली आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याने शिक्षकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेकजण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. गेल्या वेळी विस्थापित झालेले शिक्षक आतुरतेने बदली प्रक्रियेची वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी सुरू झालेली बदली प्रक्रिया कोरोनाच्या कारणाखाली ऐनवेळी रद्द करण्यात आली. यावर्षीही सुरुवातीला ग्रामविकास विभागाने बदलीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, ३ ऑगस्ट रोजी सध्या शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही.राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया होणार आहे. मात्र, युती सरकारच्या काळातील बदली पोर्टलमध्ये चुका असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने नवे पोर्टल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु नवे पोर्टल नेमके कधी तयार होणार, याबाबत निश्चित नाही. दुसरीकडे शिक्षकांमधून विनंती बदल्या जिल्हास्तरावरच समुपदेशनाद्वारेच तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हा परिषदेतील अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांसह खुद्द शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या. दरवेळी शिक्षकांच्या बदल्या साधारण जूनपूर्वी म्हणजेच प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी केल्या जातात. त्यामुळे नव्या सत्रात शिक्षकांना नवी शाळा ‘जॉईन’ करणे सोपे जाते. विद्यार्थ्यांसाठीही ते  सोयीचे ठरते. मात्र,  यावर्षी बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावTeacherशिक्षक