लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: तालुक्यातील धुपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रात एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १0 वाजता उघडकीस आली. हरसोडा येथील पोलीस पाटील मधुकर हरिभाऊ रायपुरे यांनी दसरखेड ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली की, नदी पात्रात एक तरुण बुडाला आहे. घटनेची माहिती मिळ ताबरोबर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.उप.नि. मोहनसिंग राज पूत, पोकाँ आनंद माने, एएसआय लहू सोनोने घटनास्थळी दाखल झाले. मृतक युवक हा अंदाजे ३५ वर्षांचा असून, त्याची उंची पाच फूट सहा इंच असून, अंगात मोठय़ा चौकडीचे फूल बाहय़ाचे शर्ट अंगात काळ्या रंगाची फुल पॅन्ट, हातात लाल गंडा असून, सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवला असून, अशा वर्णनाच्या इसमाबाबत दसरखेड ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोउपनि मोहनसिंग राजपूत यांनी केले आहे.
नदीच्या पात्रात बुडाल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:14 IST
मलकापूर: तालुक्यातील धुपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रात एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १0 वाजता उघडकीस आली.
नदीच्या पात्रात बुडाल्याने युवकाचा मृत्यू
ठळक मुद्देधुपेश्वर येथील घटनामृतक युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही