शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर बलात्कार प्रकरणी युवकास १० वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:07 IST

खामगाव : १४ वर्षीय बालिकेला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी युवकास खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.

खामगाव : १४ वर्षीय बालिकेला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी युवकास खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.जळगाव जामोद तालुक्यातील वडपानी येथील १४ वर्षीय बालिका ८ मे २०१४ रोजी रात्री साडेआठ वाजता तिच्या चुलत भावाच्या घरून टी.व्ही पाहून घरी जात असताना, गावातीलच कालू लक्ष्मण राऊत (२२) याने तीचे तोंड दाबून मुंबईला पळवून नेले. या प्रकरणात मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीसांनी आरोपी कालू राऊत विरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३६६, ३७६ (२) तसेच बालकांचे लैंगिक शोषण कायदा २०१२ च्या कलम ३,४ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी आरोपीला १२ मे २०१४ रोजी अटक केली. तपासाअंती पोलीसांनी खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात ११ जणांची साक्ष घेण्यात आली. साक्षीदारांच्या साक्षीनंतर अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायालयाचे न्यायधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपी कालू राऊत याला भादंविच्या कलम ३६३ अंतर्गत ३ वर्षांची शिक्षा तसेच ५०० रूपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, भादंविच्या कलम ३६६ नुसार ५ वर्षांची शिक्षा तसेच १००० रूपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने शिक्षा, भादंविच्या कलम ३७६ (२) तसेच इतर कलमान्वये १० वर्षांची शिक्षा व २ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीला एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता रजनी बावस्कार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयRapeबलात्कार