शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कर्जाचे आमिष देत युवकाची २ लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:55 PM

Cyber Crime : २ लाख ५० हजार रुपयांपैकी १ लाख ९९ हजार रुपये एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक घेऊन काढण्यात आले.

- सुभाष वाकोडेलोकमत न्यूज नेटवर्ककनारखेड : शेगाव तालुक्यातील कनारखेड येथील युवकाला प्रधानमंत्री कर्ज योजनेद्वारे २५ लाख रुपये मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्याने खात्यात जमा केलेल्या २ लाख ५० हजार रुपयांपैकी १ लाख ९९ हजार रुपये एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक घेऊन काढण्यात आले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गावातील सचिन मुकुटराव निळे याने शेगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील सचिन निळे या तरुणाला त्याच्या  मोबाईल क्रमांकावर ९७१८९ ७२८६९, आणि ७८३५९ ३३०९७ या दोन क्रमांकांवरून दोघांनी आमिष दाखविले. त्यामध्ये प्रधानमंत्री कर्ज योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले जाईल. तसेच त्यासाठी बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्यामध्ये २.५० लाख रुपये जमा करण्याचे सांगितले. त्या दोघांनी सांगितल्याप्रमाणे सचिनने रक्कम आयसीआयसीआय बँकेत खाते उघडून जमा केली. आरोपीने २४ ऑगस्ट २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ च्या दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान सचिन याच्या एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक विचारले. त्यावेळी व्यवहार करून १ लाख ९९ हजार रुपये खात्यातून काढले. ही बाब लक्षात येताच फसवणूक झाल्याचे सचिनला समजले. त्यामुळे आशिष कुमार मिश्रा आणि अरुण जैन या दोघांच्या मोबाईल क्रमांकावरून त्याला काॅल आल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ४२० भादंवी ६६  (क) ( ड) माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ अन्वये शनिवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप वडगावकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा