शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
6
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
7
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
8
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
9
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
10
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
11
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
12
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
13
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
15
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
16
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
17
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
18
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
19
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
20
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 

बुलडाण्यात आपचा फुगा फुटला!

By admin | Updated: May 16, 2014 22:52 IST

बुलडाण्यात लोकसभा मतदार संघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार सुधीर सुर्वे यांना ३४२९ मतदानावर समाधान मानून पराभव पत्करावा लागला आहे.

बुलडाणा: जनलोकपाल आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रकाशझोतात आणून दिल्ली काबीज केलेल्या आम आदमी पार्टीचा लोकसभा निवडणुकीत मात्र फुगा फुटला. बुलडाण्यात लोकसभा मतदार संघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार सुधीर सुर्वे यांना ३४२९ मतदानावर समाधान मानून पराभव पत्करावा लागला आहे. दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांची जादू चांगलीच चालली होती. यातून आम आदमी पार्टीकडून लोकसभा निवडणूक २0१४ साठी उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले. बुलडाणा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून आम आदमी पक्षाचे सुधीर सुर्वे निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे आणि अण्णा हजारे सर्मथक अपक्ष बाळासाहेब दराडे यांच्याशी सुधीर सुर्वे यांची लढत झाली; मात्र नरेंद्र मोदीच्या ह्यनमोह्ण मंत्रापुढे आपचा जलवा चालू शकला नाही. असे चित्र आजच्या निकालातून स्पष्ट झाले. बुलडाण्यात प्रचारसभा घेऊन अंजली दमानियासारखी आपची दिग्गज नेता सुर्वे यांना वाचवू शकली नाही. स्वत:ची अनामत रक्कम वाचविता यावी, ऐवढेही मताधिक्यही सुधीर सुर्वे यांना मिळवता आले नाही.               बुलडाणा विधानसभा मतदार संघात सुर्वे यांना ५१२ मते, चिखली मतदार संघात ४६६ मते, सिंदखेडराजा मतदार संघात ४१३ मते, मेहकर मतदार संघात ४५७ मते, खामगावमध्ये ८0२ मते आणि जळगाव जामोद मतदार संघात ७६४ आणि पोस्ट बॅलेट पेपरची ६ अशा एकूण ३४२९ मतांवर समाधान मानून पराजय पत्कारावा लागला.