विहिरीत आढळला युवक- युवतीचा मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 07:52 PM2021-10-13T19:52:50+5:302021-10-13T19:54:33+5:30

Young man and women body found in well : भालेगाव बाजार येथील सुरेश रामदास भांबळकर व दुर्गा समाधान सावरकर या दोघांचा मृतदेह १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आढळला.  

Young man and women body found in well | विहिरीत आढळला युवक- युवतीचा मृतदेह!

विहिरीत आढळला युवक- युवतीचा मृतदेह!

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांपासून होते बेपत्ता:मृतक भालेगाव बाजार येथील!!

पिंपळगाव राजा : गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत भालेगाव बाजार येथील सुरेश रामदास भांबळकर व दुर्गा समाधान सावरकर या दोघांचा मृतदेह १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आढळला.  
      पिंपळगाव राजा येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या बाजूला विठ्ठल मधुकर पाटील बुधवारी सकाळी शेतात विहिरीजवळ पाणी काढायला गेले असता युवक - युवतीचा मृतदेह निदर्शनास पडला. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सतीश आडे, पोलिस उपनिरीक्षक मोहन हिवाळे व सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आले. भालेगाव बाजार येथील युवक सुरेश रामदास भांबळकर व युवती दुर्गा समाधान सावरकर या दोघांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथिल सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी पंचक्रोशीतील गावकºयांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत असून युवक - युवतीच्या आत्महत्येचा सखोल तपास पोलिसानी करण्याची मागणी नागरिकांनी केली. युवक- युवती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची  तक्रार पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल आहे. घटनास्थळाच्या बाजूला अपघात झालेली एक विनानंबर दुचाकी दोन दिवसांपासून पडलेली होती. या दुचाकीबद्दल दोन दिवसांपूर्वी गावकºयांनी पोलिसांना माहिती दिली होती. युवक युवतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची माहिती वाºयासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन हिवाळे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Web Title: Young man and women body found in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.