शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकऱ्याच्या तोफेचा शेतशिवारात बुलंद आवाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 15:10 IST

मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील युवा शेतकºयाच्या या तोफच्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवारातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण होण्यास मोठी मदत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. परंतू वन्यप्राण्यांच्या या संकटावर एका प्रयोगशील युवा शेतकºयाने गावठी तोफ बनवून अनोख्या पद्धतीने मात केली आहे. मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील युवा शेतकºयाच्या या तोफच्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवारातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण होण्यास मोठी मदत होत आहे.पीक चांगले बहारात येताच माकड, हरिण, निलगाय, रोही यासारख्या वन्यप्राण्यांचा धुमाकूळ त्या पिकांमध्ये सुरू होतो. अनेक वेळा पिकांचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर सुद्धा वन्य प्राण्यांपासून हल्ले झालेले आहेत. त्यावर जालीम उपाय म्हणून ऊमरा देशमुख येथील युवा शेतकरी प्रशांत साहेबराव कानोडजे यांनी गावठी तोफ तयार केली आहे. या तोफचा स्पोट ऐकून आता वन्य प्राणी शेतशिवारातही फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये स्फोटासाठी कॅल्शीयम कार्बोनेटचा उपयोग करण्यात आला आहे. या स्फोटामुळे वन्य प्राणी व इतर पक्ष्यांपासूनही पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण होत आहे. सध्या शेतात तूर, हरभरा, गहू, रब्बी ज्वारी यासह विविध रब्बी पिके आहेत. या पिकांना वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी प्रशांत कानोडजे यांनी तयार केलेली तोफ अत्यंत फायद्याची ठरत आहे.

तोफ बनविण्यासाठी वापरलेले साहित्य

प्लास्टिकचा अडीच इंच पाईप एक फूट, दोन इंच पाईप दोन फूट, गॅससाठी वापरण्यात येणारे लाईटर, स्फोटक म्हणून कॅल्शीयम कार्बोनेट आदी साहित्य तोफ बनविण्यासाठी वापरण्यात आले आहे.

असा होतो प्रयोग

प्लास्टिक व इतर साहित्याच्या सहाय्याने बनविलेल्या तोफमध्ये एकावेळी तूरीच्या दाण्याऐवढे कॅल्शीयम कार्बोनेट व पाण्याच्या दोन ते तीन थेंब टाकले जातात. त्यानंतर लाईटरचे बटन दाबताच सुतळी बॉम्ब पेक्षाही मोठा आवाज होतो. हा बार फुटताच शिवारात घुमणाºया आवाजाने वन्य प्राणी शेतातून दूर पळतात.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी