शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

योग, प्राणायाम जीवनशैली बनली पाहिजे - शेखर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:23 IST

योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.

- सोहम घाडगेलोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन, जर्मनी, स्पेनसारख्या विकसित देशात बाधितांचा व मृत्यू पावणाºयांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्व जग एकत्रित प्रयत्न करीत आहे.  मात्र अद्याप यावर प्रभावी लस शोधण्यात यश मिळालेले नाही. खबरदारी,शारीरिक तंदुरुस्ती व नियमांचे काटेकोर पालन करणे हाच सर्वात मोठा उपाय आपल्याकडे आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.

जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात सध्या कोणती कामे सुरु आहेत?दहावी आणि बारावीतील खेळाडू  विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर २५   गुण दिले जातात. क्रीडा विभागाकडे जवळपास १ हजार प्रस्ताव आले आहेत. अधिकारी, कर्मचारी त्याबाबत छाननी करीत आहेत. छाननी केल्यानंतर त्याचा अहवाल पाठविण्यात येईल. साधारण ८०० पेक्षा अधिक खेळाडू विद्यार्थ्यांना या  ग्रेस गुणांचा लाभ मिळेल. 

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय सांगाल?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याशिवाय प्रत्येकाने योगा, प्राणायाम, व्यायाम करुन शरीर तंदुुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. मी स्वत: नियमित योगा, प्राणायाम करतो. प्रत्येकाने चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. 

कोरोनामुळे जिल्ह्यातील क्रीडा घडामोडींवर काय परिणाम झाला?सुटीचा काळ असल्याने स्पर्धा आयोजनावर  परिणाम झाला नाही.  मात्र ग्रीष्मकालीन शिबिरे पुढे ढकलण्यात आली आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच जिल्ह्यातील क्रीडा उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल.प्रशासनाचे प्रयत्न,नागरिकांचे सहकार्य व लोकप्रतिनिधींची साथ यामुळे आपण कोरोनावर बºयाच अंशी नियंत्रण मिळविले आहे. कोरोना हे जागतिक संकट आहे. यावर मात करण्यासाठी टीमवर्क महत्वाचे आहे.  प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी अजून जास्त पालन केल्यास कोरोनावर मात करता येईल. 

कोरोनाची जिल्ह्यात परिस्थिती कशी आहे?जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाबत परिस्थिती खूप  नियंत्रणात आहे. आपल्या शेजारी अकोला, औरंगाबाद, जळगाव खांदेशची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यातुलनेत आपल्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. नागरिकांनी अजून जास्त प्रमाणात प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. घरातच थांबा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, स्वत:ची, कुटूंबाची काळजी घ्या. जीवापेक्षा जास्त काहीच नाही.जीवन अनमोल आहे. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नियम पाळण्याची सवय करुन घ्यावी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतYogaयोग