मेहकर तालुक्यातील दीडशे घरकुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:17 PM2018-05-23T17:17:48+5:302018-05-23T17:17:48+5:30

मेहकर: गेल्या दोन वर्षापासून मेहकर तालुक्यातील जवळपास दीडशे घरकुलाचे बांधकाम रखडल्याने गोरगरीब लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहत आहेत.

The work of 150 houses of Mehkar tehsil was stopped | मेहकर तालुक्यातील दीडशे घरकुलाचे काम रखडले

मेहकर तालुक्यातील दीडशे घरकुलाचे काम रखडले

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१६-१७ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यासाठी ३७५ घरकुले मंजुर झाली होती. या योजनेतून केवळ २५६ घरकुल पुर्ण होऊन ११९ घरकुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून अपुर्ण अवस्थेत आहेत. या दोन्ही योजना मिळून १५३ घरकुले दोन वर्षापासून अपूर्ण आहेत.

मेहकर: गेल्या दोन वर्षापासून मेहकर तालुक्यातील जवळपास दीडशे घरकुलाचे बांधकाम रखडल्याने गोरगरीब लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहत आहेत. पंचायत समितीचे सबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने घरकुल योजना अपुर्ण राहत आहे. ग्रामीण भागात राहणाºया गोरगरिबांंना आपल्या हक्काचे घर असले पाहिजे, ज्यांचे पडके व कच्चे घर आहे अशा लोकांसाठी शासनाने सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या नावाने घरकुल योजना सूरू केल्या आहे. या घरकुल योजनांचा बहुतांश गरीबांना फायदा मिळाला असला तरी पण काही गावामध्ये धनदांडग्या लोकांना सुध्दा घरकुल देण्यात आले आहे. ज्यांचे पक्के घरे आहेत. अशा लोकांनासुध्दा घरकुल देण्यात आली आहेत. यामुळे ज्यांना खरोखर घरकुलाची आवश्यकता आहे. ज्यांचे कच्चे व पडके घर आहेत असे अनेक गोरगरीब अजूनही घरकुलापासून वंचित राहत आहेत. पंचायत समितीचे सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने अनेक गावातील घरकुले अपुर्ण अवस्थेत आहेत. सन २०१६-१७ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यासाठी ३७५ घरकुले मंजुर झाली होती. घरकुल मंजुर झाल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये घरकुलाचे बांधकाम पुर्ण करणे गरजेचे आहे. मात्र या योजनेतून केवळ २५६ घरकुल पुर्ण होऊन ११९ घरकुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून अपुर्ण अवस्थेत आहेत. शबरी आवास योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये मेहकर तालुक्यासाठी ९८ घरकुले मंजुर झाली होती. यामध्ये केवळ ६४ घरकुले पुर्ण होऊन ३४ घरकुले अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहेत. या दोन्ही योजना मिळून १५३ घरकुले दोन वर्षापासून अपूर्ण आहेत. त्यामुळे मेहकर तालुक्यातील जवळपास दीडशे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने घरकुलाचे कामे रखडली आहे. (तालुका प्रतिनिधी) बॉक्स... प्रधानमंत्री घरकुलसाठी २२२६ लाभार्थी पात्र ज्यांची घरे कच्चे व पडके आहेत अशा लोकांना घरकुल मिळाले पाहिजे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ही योजना सर्व जातीसाठी असून या योजनेअंतर्गत आॅगस्ट २०१७ मध्ये मेहकर तालुक्याचा सर्वे करण्यात आला होता. या योजनेत २४ हजार ३१३ लाभार्थ्यानंी घरकुलासाठी अर्ज दिले होते.या अर्जाची छानणी होऊन या योजनेत २ हजार २२६ लाभार्थी पात्र ठरले आहेत. पंचायत समिती स्थरावरून पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून मंजुरात मिळाल्यानंतर घरकुले बांधकाम करण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री घरकुल गरिबांना गाजर

प्रत्येक गावातील गरीबांना घर मिळाले पाहिजे हा प्रधानमंत्री घरकुल योजनेचा उद्देश असला तरी अनेक धनदांडग्या लोकांची नावे यादीत आहेत. खरे व पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. यापुर्वी इंदिरा आवास योजना सूरू होती. त्या इंदिरा आवास योजनेतून गरीबांना घरे मिळाले असती. परंतू शासनाने इंदिरा आवास योजना बंद करून प्रधानमंत्री योजना सुरू केली. प्रधानमंत्री योजना म्हणजेच गरिबांना गाजर असा आरोप दादुल गव्हाणचे ग्रा.प. सदस्य अरूण दळवी यांनी केला आहे.

ज्यांची घरकुल अपूर्ण असतील अशा लाभार्थ्यांची माहिती घेवून घरकुल पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

-अशोक सानप सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.मेहकर

Web Title: The work of 150 houses of Mehkar tehsil was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.