बुलडाणा : धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असलेल्या वरली मटका, जुगार तथा अवैध देशीदारु व्यवसाय आठ दिवसात बंद करा, या मागणीसाठी मोताळा तालुक्यातील महालुंगी जाहागिर येथील जिजाऊ महिला मंडळाच्या माहिलांनी २ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे आंदोलन केले. मोताळा तालुक्यातील महालुंगी जाहागीर गावात दारुविक्रीचा परवाना कोणालाही देण्यात आला नाही. असे असतानाही गावात मोठय़ा प्रमाणात देशी दारुची अवैध विक्री सुरु आहे. मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील दारुचे दुकान बंद करण्यात आले आहे, त्यामुळे या गावातील नागरिक दारु पिण्यासाठी महालुंगी जाहागीर गावात येतात. यामुळे गावात अवैध धंदे फोफावत असून, सामाजिक शिष्टांचाराचा भंग होत आहे, असा आरोप करुन आठ दिवसात गावातील दारुची अवैध विक्री बंद करा, अशी मागणी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील चांधई येथील महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदारास निवेदन दिले.
दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन
By admin | Updated: February 3, 2015 00:09 IST