चिखली (जि. बुलडाणा) : मुली व महिलांनी आत्मनिर्भर व्हावे व ह्यअबलाह्ण म्हणून घेण्याऐवजी ह्यसबलाह्ण होऊन जगावे, असा मौलीक उपदेश अप्पर पोलिस अधिक्षक श्वेताताई खेडकर यांनी किशोरवयीन मुलींना दिला. येथील स्त्री शक्ती ग्रुप आणि ङ्म्री शिवाजी विद्यालयच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींसाठी ङ्म्री शिवाजी विद्यालयात १५ ते २३ एप्रिल दरम्यान कराटे, ऐरोबिक्स, योगासने यांचे प्रशिक्षण व चारित्र्य आणि आरोग्यासहित नैतिक मूल्यशिक्षण, किशोरवयातील मुलींचे शारिरीक बदल व घ्यावयाची काळजी व प्रश्न यासह इतर विषयांवर प्रसिध्द तज्ञांचे मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ९ दिवसीय या मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे उद्घाटन १५ एप्रिल रोजी अ प्पर पोलिस अधिक्षक श्वेताताई खेडकर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.इंदुमतीताई लहाने होत्या. यावेळी शिबीरार्थी मुलींशी संवाद साधताना श्वेताताई खेडकर यांनी वर्तमान परिस्थिती आणि बदलते वातावरण याचा ताळमेळ मुलींनी कसा लावावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलचा दुरूपयोग कसा होत आहे, त्यामुळे किती वाईट घटना घडत आहेत याचा उहापोह विविध सत्य घटनांचा दा खला देत केला. सोबतच मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सर्मपक उत्तरे देवून समाधानही केले. तर अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.इंदुमती ताई लहाने यांनी मुलींना आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि स्त्री असल्याचा अभिमान बाळगा असे आवाहन करून नै ितकतेचे मूल्य प्रत्येक मुलीने संवेदनशील बनून अंगिकारावे, त्याशिवाय राष्ट्राची होणार नाही, असे नमूद केले.
‘स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे’
By admin | Updated: April 17, 2015 01:35 IST