सासूचा खून करणाऱ्या सूनेस आजन्म कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:07 PM2019-08-28T18:07:29+5:302019-08-28T18:07:40+5:30

खामगाव: वृध्द सासूचा खून करणाºया एका सुनेस न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

Women get life imprisonment in Murder case of mother-in-law | सासूचा खून करणाऱ्या सूनेस आजन्म कारावास!

सासूचा खून करणाऱ्या सूनेस आजन्म कारावास!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: वृध्द सासूचा खून करणाºया एका सुनेस न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.
जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील शेवंताबाई शंकर पांडे (६५)या वृध्द महिलेची हत्या झाल्याची घटना ८ सप्टेंबर २०१६ रोजी घडली होती. सासू सुनेच्या वादातून सुनेने सासूला मारहाण करीत तिच्या  डोक्यात कुºहाडीने घाव घातले. त्यानंतर सासूचा खून तिच्या मनोरूग्ण  मुलाने म्हणजेच दिर विलास पांडे याने केल्याचा आरोप लावला.  मात्र, महिलेच्या पतीच्या संशयावरून जळगाव जामोद पोलिसांनी प्रतिभा पांडे हिची उलट तपासणी केली. त्यावेळी तिने सासूचा खून आपणच केल्याची कबुली दिली. यावरून जळगाव जामोद पोलिसांनी सुने विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ९ साक्षीदारांच्या बयाण तपासले. यामध्ये सौ. प्रतिभा गणेश पांडे हिच्यावर गुन्हा सिध्द झाल्याने तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी सरकार पक्षाकडून अ‍ॅड. रजनी बावस्कार यांनी काम पाहीले.

Web Title: Women get life imprisonment in Murder case of mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.