शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
2
Sanjay Raut : "लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला
3
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
5
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
6
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
7
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
8
Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक
9
विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, १० वर्षे लिव्ह इनमध्ये राहिली अन् नंतर मिळाला धोका
10
"सत श्री अकाल!" अमेरिकेच्या अभिनेत्याला दिलजीत दोसांजने शिकवली पंजाबी; धमाल व्हिडीओ व्हायरल
11
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
12
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
13
Dolly Chaiwala Net Worth: परदेशीही आहेत डॉली चायवाल्याच्या चहाचे चाहते, सेलेब्सपेक्षा अधिक कमाई; नेटवर्थ जाणून थक्क व्हाल
14
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
15
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
16
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
17
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
18
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
19
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
20
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी

महिलांचा ग्राम पंचायतवर हल्लाबोल; कार्यालयातील सामानाची नासधूस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:27 PM

सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी  त्यांच्याविरोधात नारेबाजी केली.

सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी  त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. संतप्त महिलांनी शनिवारी सकाळी दगडफेक करीत कार्यालयातील सामानाची नासधूस केली.   गोरेगाव येथे २५ वर्षापूर्वी सावंगी माळी धरणावरुन जलशुध्दी केंद्रासह ७० लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. कामही पुर्ण झाले. पण गावात पाणी पोहचलेच नाही. याला तत्कालीन प्रशासन जबाबदार धरल्या जात असतांना दोन वेळा त्याच नळयोजनेच्या दुरूस्तीवर खर्चही करण्यात आला. पण उपयोग झाला नाही. त्यानंतर  गावालगत नाल्याजवळ विहीर घेण्यात आली. तिही फेल ठरली. त्यानंतर माजी सरपंच रामदास पंचाळ यांच्या शेतात एक विहीर घेण्यात आली. त्यावरुनही पाणीपुरवठा करण्यास ग्राम पंचायत प्रशासन अपयशी ठरले. गेल्या २५ वर्षापासून पाणी असतानाही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.   आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी एक कोटीची योजना पुन्हा मंजूर केली. त्या योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे. जलवाहिनीचे काम पुर्ण झाले. राजेगाव येथील तलावावरुन पाणी सरळ विहीरीत सोडल्या जात आहे.  मात्र ते पाणी दुषीत असल्याचा आरोप माजी उपसरपंच पठाण यांनी केला. ते पाणीही पंधरा दिवसातून एकवेळा गावात सोडल्या जाते. त्यामूळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून गोरेगाव ग्रामपंचायत बंद होती. दरम्यान ५ जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय महिलांना उघडे दिसले. सचिव मनोज मोरे आणि संजय पंचाळ कार्यालयात उपस्थित होते. महिलांच्या ही बाब लक्षात येतात दीडशेहून अधिक महिला ग्राम पंचायतीवर मोर्चा घेवून आल्या. यावेळी  बाचाबाची झाली. त्यात दगडफेकही झाली. तर काहींनी आपला राग कार्यालयातील सामानावर काढून नासधूस केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी सचिव मनोज मोरे पोलीस स्टेशनमध्ये गेले असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाgram panchayatग्राम पंचायत