लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोणार तालुक्यातील बिबी येथे भरधाव ट्रॅक्टरने मुलासोबत घरी जात असलेल्या एका महिलेला जबर धडक दिल्याने त्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव गंगुबाई महादेव परदेशी असे आहे. मोलमजुरी करून ही महिला तिचा उदरनिर्वाह करत होती. ३ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या मुलासमवेतही महिला पायी घरी जात असताना दुसरबीडकडून मेहकरकडे जाणाऱ्या एका विनानंबरच्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने या महिलेला धडक दिली. त्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा रामू परदेशी याने बिबी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बिबी पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल कडुबा डोईफोडे हे करीत आहेत.
ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:19 IST
Accident News : या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव गंगुबाई महादेव परदेशी असे आहे.
ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
ठळक मुद्दे घटना ३ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडलीविनानंबरच्या भरधाव ट्रॅक्टरने या महिलेला धडक दिली