शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनातून पडल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:16 IST

अ‍ॅपेतून पडून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिखली बुलडाणा मार्गावरील सव फाट्याजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भरधाव जाणारा अ‍ॅपे गतिरोधकावर आदळल्याने अ‍ॅपेतून पडून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिखली बुलडाणा मार्गावरील सव फाट्याजवळ घडली. हा अपघात घडल्यानंतर अ‍ॅपे चालक घटना स्थळावरून फरार झाला होता.चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा हे अमिना बी अमिन शहा (वय २७) या विवाहितेचे माहेर आहे. ही महिला त्यांची बहिण रुकसाना व चार मुलासह एका अ‍ॅपेमध्ये बसून सासरी मलकापूरकडे जात होती. चिखली ते बुलडाणा अ‍ॅपेने प्रवास करीत असताना सव नजीक असलेल्या रस्त्यावरील गतीरोधकावर भरधाव अ‍ॅपे आदळला. त्यामुळे अ‍ॅपेतील अमिना बी अमिन शहा ही महिला बाहेर फेकल्या गेली. या अपघातात तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून तिला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीला मृत घोषीत केले. दरम्यान अपघात घडताच अ‍ॅपेचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. प्रकरणी वृत्त लिहिपर्यत पोलिस स्टेशनला कुठलाच गुन्हा दाखल झाला नव्हता. मोटार सायकल अपघातात तीन जखमीसाखरखेर्डा: लव्हाळा - हिवरा आश्रम रोडवर एका दुचाकीची व अज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले असून एका युवकाचा पाय तुटून बाजूला पडला. तर दोघांच्या पायाला जबर मार लागला आहे. हा अपघात १७ जानेवारीला रात्री दरम्यान घडला. हिवरा आश्रम येथे यात्रेला तांदूळवाडी येथील तीन युवक दुचाकीने गेले होते. तेथून रात्री ९.३० वाजता साखरखेर्डा मार्ग तांदूळवाडी येथे जात असताना त्यांची दुचाकी आणि अज्ञात वाहनांची धडक झाली. त्या अपघात अक्षय शालीग्राम जाधव या २५ वर्षीय युवकांच्या पायाचा तुकडा पडला. दुचाकीवर मागे बसलेले प्रशांत माहादू जाधव, सचिन मोरे हे जखमी झाले. हिवरा आश्रम येथून साखरखेर्डा येथे शुभम राजपूत हे येत होते. त्यांनी तिघांनाही वाहनात टाकून साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. संदिप सुरुशे यांनी तातडीने उपचार करुन बुलडाणा येथे रेफर केले.

‘त्या’ दोघांवरही औरंगाबाद येथे उपचार सुरूसाखरखेर्डा ते लव्हाळा रोडच्या कडेला ११ जानेवारीला रात्री उशिरा दोन व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत परिवहन अधिकारी यांच्या लक्षात आले. त्या दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता साखरखेर्डा येथील शिक्षक वसंता नाईक, गोटू मुदमाळी हे गंभिर जखमी झालेले आढळून आले. त्यांच्यावर उपचार करुन औरंगाबाद येथे रेफर केले असून तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात