शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ढासाळवाडी तलावात पाच भाविकांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:43 IST

हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथील ढासाळवाडी तलावात ऑक्टोबर महिन्यात तब्बल पाच भाविकांचे मृत्यू झाले. या तलाव परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने तहसीलदार सुरेश बगळे यांनी बुधवारी तलावर परिसराची पाहणी केली.

ठळक मुद्देतहसीलदारांकडून पाहणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार!

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथील ढासाळवाडी तलावात ऑक्टोबर महिन्यात तब्बल पाच भाविकांचे मृत्यू झाले. या तलाव परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने तहसीलदार सुरेश बगळे यांनी बुधवारी तलावर परिसराची पाहणी केली. वर्षभरात ढासाळवाडी येथील तलाव दहा ते १२ भाविकांचे प्राण घेत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. धोकादायक ठरणार्‍या या तलाव परिसरात सुरक्षात्मक उपाय गरजेचे आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वीच जालना येथील एका भाविकाचा यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानुषंगाने येथे आता उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाहणीदरम्यान, पंचायत समिती सदस्य चाँद मुजावर, दीपक सोर, गणेश वानखेडे, शेख मुस्ताक, दिनकर शेवाळे उपस्थित होते.

कपड्यांचा गुंता जीवघेणासैलानी दर्गा येथे दर्शनासाठी येणारे भाविक या तलावात स्नान करतात. सोबतच त्यांच्या अंगावरील वापरलेले कपडे तलावातच सोडून देतात. त्यामुळे तलावात कपड्यांचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. १९८0 च्या दशकात निर्माण झालेल्या या तलावात मोठय़ा प्रमाणात गाळही साचलेला आहे. दोन्हीच्या एकत्रित परिणामातून पाण्यात गेलेल्या व्यक्तीचा या गुंत्यात अडकून मृत्यू होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातच बेशरमची झुडुपे ही येथे चारही दिशांना वाढल्यामुळे आपतकालीन स्थितीत मदत करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे हा गाळ आणि साचलेले जुने कपडे काढून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. व्यंकटेश ग्रुपचे पाटील हे काम मोफत करणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू