शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

सीइटी व ट्रीपलआयटीच्या परीक्षा एकाच दिवशी, हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 20:23 IST

तारीख बलण्याची पालकांची मागणी.

 विवेक चांदूरकर, खामगाव : महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी - सीइटी पीसीएम आणि ट्रिपल आयटी परीक्षेचे हॉल तिकीट्स उपलब्ध झाले असून, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या दोन्ही परीक्षा ४ मे ला एकाच दिवशी आहेत. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली आहे.

२८ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एमएचटी - पीसीएम या विषयांसाठी होणारी सीईटीची परीक्षा २ ते १७ मे २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या पत्रानुसार २५ ते ३० एप्रिलपर्यंत होणार होती. ही परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याने देशभरातील हजारो विद्यार्थी आणि पालकांनी ४ मे रोजी होणाऱ्या ट्रीपलआयटी हैद्राबाद प्रवेश परीक्षा देण्याकरिता अर्ज केले आहेत. आता ४ मे रोजी एमएचटीसीइटी पीसीएम परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी ट्रीपलआयटी हैदराबादच्या परीक्षाही आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेची संधी गमवावी लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी केलेली अभ्यासाची मेहनत, अमूल्य वेळ, परीक्षा फी, श्रम आणि महत्त्वाचे म्हणजे करिअरची संधी गमवावी लागणार आहे. नीट युजीप्रमाणेच सीईटी पीसीएम परीक्षेची वैयक्तिक कारणास्तव तारीख बदलण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक प्रा. संजय व्यवहारे, प्रा. दीपक भिंगारदेवे, प्रा. विजय पांडे , शिशीर पाटील, डॉ. अजय खर्चे, अरुण मिरगे आदींनी केली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना करिअर आणि शैक्षणिक संधी प्राप्त होईल. नीटच्या विद्यार्थ्यांना तारीख बदलाचा दिला पर्यायज्या विद्यार्थ्यांची ५ मे रोजी नीट परीक्षा आहे आणि एमएचटी सीइटीही पीसीएम परीक्षा त्याच दिवशी आहे. ती रद्द करून त्यांना वैयक्तिक कारणांसाठी दिनांक बदलण्याचा पर्याय दिला आहे. ज्याप्रमाणे नीट यूजीच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव एमएचटी सीइटी पीसीएम परीक्षेची तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ट्रीपल आयटी हैद्रबाद परीक्षा विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव सीईटी पीसीएम तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा.- किशोर वाघ,पालक, चिखली

टॅग्स :buldhanaबुलडाणा