शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर शहरातील स्मशानभूमीतअघोरी पूजा; नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:04 IST

Witchcraft at Malkapur City Cemetery : काळे कपडे घातलेले तीन मांत्रिक मृत आत्म्यांना शांती मिळो यासाठी पूजा-अर्चना करताना दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्मशानभूमीतील अघोरी पूजेमुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली.  प्रेतात्मा जागृत करण्यासाठी ऐन मध्यरात्री ही अघोरी पूजा करण्यात आल्याच्या चर्चेमुळे परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. दरम्यान, काही नागरिकांनी हिमतीने स्मशानभूमीत प्रवेश केला असता, तीन मांत्रिक मृतात्म्यांच्या शांतीसाठी ही पूजा करताना आढळून आले.मलकापूर शहरातील स्मशानभूमीत रात्री मेणबत्त्या पेटविण्यात आल्या. यावेळी मांत्रिकांचा मंत्रतंत्रांचा  आवाज ऐकून स्मशानास लागून असलेल्या माता महाकालीनगरातील लोक भयभीत झाले. त्यानंतर वस्तीतील नागरिक गटाने  स्मशानभूमीत गेले तेव्हा तेथे प्रेत जाळण्याच्या ठिकाणी काळे कपडे घातलेले तीन मांत्रिक जादूटोण्यासाठी असलेले विविध साहित्यासह मृत आत्म्यांना शांती मिळो यासाठी पूजा-अर्चना करताना दिसले. हा  प्रयोग करत असल्याचे नागरिकांना आढळून आले.   यामध्ये डॉ. अशोक गोठी यांचे पुत्र  आशिष गोठी आणि  मांत्रिकांचा समावेश होता.  वडिलांच्या व भावाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पूजाअर्चा केल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले. मात्र, अवेळी पूजेचे कारण विचारले असता आशिष गोठीची भंबेरी उडाल्याने, तसेच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने  नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. तीन मांत्रिक व आशिष गोठी यांना ताब्यात घेऊन कार्यवाहीसाठी पोलिसांनी  शहर पोलीस स्टेशनला नेले.

मुख्य मांत्रिक छत्तीसगडचा...  अघोरी पूजा करणारा मांत्रिक छत्तीसगड येथील असून  तीन मांत्रिकांवर कलम ११०/११७  प्रमाणे तर आशिष गोठी याच्यावर कलम १८८ अशी प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी दाखल केल्याचे समजते.   घटनास्थळी काळे कपडे घालणारे ते तीन इसम मांत्रिक असल्याची चर्चा जनमानसात होत आहे. 

टॅग्स :Malkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा