सरंबा येथे वादळी पावसाचा तडाखा

By Admin | Updated: June 2, 2017 00:30 IST2017-06-02T00:30:50+5:302017-06-02T00:30:50+5:30

सरंबा : देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा या गावाला १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला.

Windy rains at Saramba | सरंबा येथे वादळी पावसाचा तडाखा

सरंबा येथे वादळी पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्क
सरंबा : देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा या गावाला १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला.
यामध्ये गावातील शाळांसह ग्रामस्थांचे घर, मंदिराचे मोठे नुकसान झाले. शिवाय झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत खांब तुटून पडल्यामुळे वीज सेवा प्रभावित झाली आहे. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सरंबा व परिसरात जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दीड तास झालेल्या या वादळाचा जोर जास्त असल्यामुळे गावातील जि.प.शाळेवरील पत्रे उडाली, तसेच गावातील मंदिराचे नुकसान झाले. या दरम्यान गावातील गजानन किसन गीते व संतोष भगवान गीते यांच्या घरावरील पत्रे लांब जावून पडली. शिवाय मुख्य मार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे. वादळामुळे गावातील व शेतातील विद्युत खांब तुटून पडल्यामुळे गावातील वीजसेवा विस्कळीत झाली आहे.

Web Title: Windy rains at Saramba