शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बियाण्यांच्या मोबदल्यात बियाणे किंवा आर्थिक मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:43 IST

जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा सविस्तर अहवाल मागितला असल्याचे पालकमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याचा मुद्दा गंभीरतेने घेतला असून प्रकरणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दर्जेदार बियाणे किंवा आर्थिक स्वरुपात मदत देण्यात येईल. यासंदर्भात संबंधित बियाणे कंपन्यांशी चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा आपण सविस्तर अहवाल मागितला असल्याचे पालकमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात पाऊस पडला. त्यामुळे १०० मिमी पेक्षाही कमी पाऊस असतानही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र बहुतांश सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे ४४३ शेतकºयांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या अधिकाºयांनी थेट बांधावर जावून पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत कृषी विभागाला सुचनाही दिल्या आहेत. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशीही या मुद्दयावर सविस्तर चर्चा केली असून यासंदर्भातील सविस्तर अहवालही त्यांना मागितला आहे. जिल्ह्यात ५५७ हेक्टरवरील सोयाबीनचेबियाणे उगवले नसल्याचे स्पष्ट आहे.प्रकरणी बियाणे बनविणाºया संबंधित कंपन्यांशीही या मुद्द्यावर चर्चा झाली असून बहुतांश कंपन्यांनी शेतकºयांना दर्जेदार बियाणे देण्याबाबत किंवा प्रसंगी आर्थिक स्वरुपात मदत देण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात २ लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणीबुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आतापर्यंत झालेली असून जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र हे चार लाख नऊ हजार २११ हेक्टर आहे. जिल्ह्यातील पेरणी योग्य असलेल्या सात लाख ३४ हजार १७७ हेक्टरपैकी ५६ टक्के क्षेत्रावर केवळ सोयाबीनची पेरणी होत असते. त्यामुळे बोगस सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने गंभीर असल्याचे निदर्शनास येत आहे.

गतवर्षीही सोयाबीनलाच बसला होता फटकागेल्या वर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक खराब झाले होते. तर मेहकर आणि लोणार तालुक्यात पैनगंगेसह अन्य नद्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात घुसून शेतकºयांच्या सोंगून ठेवलेल्या सुड्याही पाण्यात वाहून गेल्याने पाच कोटीं रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.मध्यप्रदेशातील कंपनीला नोटीससोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी पाहता बहुतांश कंपन्यांनी दुसरे बियाणे देण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले असले तरी मध्य प्रदेशातील रवि सिड्स या कंपनीने यासाठी नकार दिला असल्याचे पालकमं६ी म्हणाले. त्यामुळे या कंपनीला त्यामुळे नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुढील काळात नेमका काय निर्णय होतो, याककडे सध्या शेतकºयांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी