शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरविणाऱ्यांची गय करणार नाही -   जिल्हाधिकारी सुमन चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:57 IST

जिल्ह्यात १३ ही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बुलडाणा: कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील व्याप्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून अफवा पसरविणाºयांची गय केली जाणार नाही. समाजमाध्यमांवर चुकीच्या पोस्ट व्हायरल करून अधिकारी अधिकारी, कर्मचाºयांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे प्रकार खपून घेतल्या जाणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी १३ एप्रिल रोजी स्पष्ट केली. दरम्यान, जिल्ह्यात १३ ही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.रविवारी स्त्री रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आलेल्या काहींनी तेथील असुविधेबाबत चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली. संबंधीत प्रकारात प्रसंगी कारवाईही केल्या जावू शकते. मात्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात संबंधितांना कल्पना दिली आहे. मात्र येत्या काळात असे प्रकार झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.

१३ कोवीड केअर सेंटरजिल्ह्यातील १३ ही तालुक्यात २०० बेड मर्यादेचे कोवीड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. शेगावच्या धर्तीवर ते उभारण्यात येणार आहे. त्यामुळे बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयावर पडणारा ताणही कमी होईल. बुलडाणा येथे फक्त क्रिटीकल असणारेच रुग्ण आणल्या जातील. दुसरीकडे जिल्ह्यातील १६ कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट असणारेही ट्रेस आऊट करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे कम्युनीटी स्पेडचा धोका तुलनेने कमी असल्याचेही त्या म्हणाल्या. जिल्ह्याला सध्या तीन व्हेंटीलेटर मिळाले आहेत. आधीचे सात आहे. एकूण १२ व्हेंटीलेटरची मागणी आपण केली असून ते लवकरच उपलब्ध होतील, असे त्या म्हणाल्या.

‘त्या’ शहरास किती दिवस पाणी मिळते!स्त्री रुग्णालयात पाण्यासह अन्य सुविधा नसल्याची ओरड करणाºयांच्या शहरात किती दिवस पाणी मिळते असा प्रतीप्रश्नही यासंदर्भात प्रासरमाध्यमांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी उपस्थित केला. कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची प्रोटोकॉलनुसार योग्य काळजी घेतल्या जात असल्याचे स्पष्ट करत त्यांना योग्य सुविधा दिल्या जात असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस