शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी चोपडेच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:54 IST

मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची आपली तयारी असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी येथे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : हस्तलिखित सातबारा आॅनलाईन करताना बनावट नोंदीच्या आधारे निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेकांनी फसवणूक केली आहे. शासकीय दस्तवेजासोबतही त्याने खाडाखोड केल्याचे चौकशीत उघड होत आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याने हे कृत्य केल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे तलाठी राजेश चोपडेची पाठराखण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निक्षून सांगतानाच त्याच्या विरोधात चौकशी पूर्णत्वास जाताच एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार दिली जाईल. त्याच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची आपली तयारी असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी येथे सांगितले.खामगाव शहरातील प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार आणि निलंबित असलेल्या तलाठी चोपडे प्रकरणी गठीत चौकशी समिती संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या दालनात पत्र परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी चव्हाण म्हणाले की, तलाठी चोपडे याचे अनेक कारनामे साखळी पद्धतीने बाहेर येत आहे. सराईत गुन्हेगाराप्रमाणेच नियोजनबध्द कारनामे चोपडेने केले आहेत. इतकेच नव्हे तर शासकीय दस्तवेजाचे कागद फाडून काही ठिकाणी नवा कागद लावून तर काही ठिकाणी व्हाईटनर लावून आणि खाडाखोड हस्तलिखित सातबारा आॅनलाईन करताना ओडीओ प्रणाली वापरून अनेक प्लॉट धारकांचे मालक बदल बदलले. एक-दोन सातबारापर्यंत हा प्रकार थांबलेला नाही. तलाठी चोपडे याचे काळे कारनामे उघड करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तलाठी चोपडे विरोधात महसूल स्तरावर पोलिस तक्रार दाखल केली जाईल. त्याच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली जाईल. तसेच त्याची विभागीय चौकशी आणि बडतर्फ करण्याची कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले. तलाठी चोपडेची आयकर विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचेही एसडीओ चव्हाण यांनी पत्र परिषदेत सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार किटे, चोपडेच्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी गठीत समितीचे प्रमुख तथा नायब तहसीलदार विजयसिंह चव्हाण, मंडळ अधिकारी आर. डी.कुळकर्णी, जी.एस.कुळकर्णी, नितीन देशमुख, व्ही.डी. गावंडे, सूर्यकांत सातपुते आणि तलाठी ए.डी. डिवरे, डी.व्ही. शेळके, आर. एस.पल्हाडे, आर.एस. चौधरी यांची उपस्थिती होती.मुळ मालकाला मालमत्ता मिळवून देणार!चोपडेकडून फसवणूक झालेल्या मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. गृहनिर्माण सोसायट्यासह मुळ प्लॉट धारकांना त्यांची मालमत्ता मिळवून देण्याचे आपले प्रयत्न आहेत. फसवणूक झालेल्यांनी महसूल प्रशासनाकडे संपर्क साधावा, प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केल्या जाईल. प्रत्येक तक्रारीचा दररोज निपटाराही करण्यात येईल. खामगाव साज्यातील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तांची खात्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस