शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:17 IST

बुलडाणा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष सुटका करण्यात आली.

ठळक मुद्दे ९ आॅक्टोंबर २०१६ रोजी पती- पत्नीमध्ये वाद झाल्याने अर्चनाने पतीस वायरने गळफास दिला.गरमी झाल्याने हौदात बसला असता बुडून मृत्यू झाल्याचे पत्नीने दर्शविण्याचा प्रयत्न केला होता.सून अर्चना व पुतण्या विष्णू यांनी गणेशचा खून करुन मृतदेह हौदात टाकल्याचे तक्रारीत नमूद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष सुटका करण्यात आली.देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील गणेश ढाकणे याची पत्नी अर्चना (वय २५) हिचे चुलत दीर विष्णू ढाकणे (वय २२ ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. पती घरी नसल्यावर ते दोघेही गुपचूप भेटायचे. पत्नीच्या अनैतिक संबंधाची पती गणेश ढाकणेला भणक लागली होती. त्यामुळे या कारणावरुन पती- पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत गणेश याने त्याच्या आई -वडिलांनाही माहिती दिली होती. सर्वांनी मिळून अर्चनाची अनेकदा समजूतही काढली होती. दरम्यान ९ आॅक्टोंबर २०१६ रोजी पती- पत्नीमध्ये वाद झाल्याने अर्चनाने पतीस वायरने गळफास दिला. पती मृत पावल्याचे समजताच प्रियकर विष्णू ढाकणे यास घटनास्थळी बोलावले. दोघांनी मिळून गणेशचा मृतदेह हौदात टाकला. पतीला दारुचे व्यसन होते व गरमी झाल्याने हौदात बसला असता बुडून मृत्यू झाल्याचे पत्नीने दर्शविण्याचा प्रयत्न केला होता. अंढेरा पोलीस स्टेशनचे तत्कालिन ठाणेदार किशोर जुनघरे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सखोल चौकशी केली. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० आॅक्टोंबर रोजी मृताचे वडील किसन ढाकणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. सून अर्चना व पुतण्या विष्णू यांनी गणेशचा खून करुन मृतदेह हौदात टाकल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यानुसार पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकशीअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.न्यायालयाने फिर्यादी, पंच, शवविच्छेदन करणारे चिखली ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दाम्पत्य, चौकशी अधिकारी असे एकुण सात साक्षीदार तपासले. वादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. व्ही. एल. भटकर यांनी भक्कमपणे बाजू मांडली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपी अर्चना ढाकणे हिला आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. महिलेस दोन मुले आहेत.परिस्थितीजन्य पुरावा ठरला महत्वाचाअंढेरा येथील खूनप्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा महत्वाचा ठरला. मृताच्या गळ्यावर आवळून मारल्याच्या खुणा होत्या. शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी व साक्षीदारांचे पुरावे एकमेकांस सुसंगत होते. अर्चनाच्या चेहरा, कपाळ व डोक्यावर ओरबडल्याचे दिसून आले. मृतासोबत झालेल्या झटापटीत हा मार लागल्याचे न्यायालयात सिध्द झाले. जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. भटकर यांचा युक्तीवाद व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.)

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप