शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात शाळा कधी होणार अनलॉक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:02 IST

When will School Reopend : जिल्ह्यात शाळा कधी अनलॉक होणार याची उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांना लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनलाॅक करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात शाळा कधी अनलॉक होणार याची उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांना लागली आहे. परंतु याबाबत शासनस्तरावरून निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे.  कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन आणि कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविल्यास शाळा अनलॉक केल्या जाऊ शकतात. सध्या तरी याबाबत निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषद, खासगी, विना अनुदानित शाळा दीड वर्षापासून बंद आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मध्यंतरी नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्ग पुन्हा बंद करण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामळे पॉझिटिव्हिटी रेट ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार राज्य शासनाने अनलॉकचे स्तर निश्चित केले आहेत. त्यामध्ये  बुलडाणा जिल्हाही आता अनलॉक झालेला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, शासनस्तरावर शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाचा शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय कधी होतो, याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शासन निर्णयानंतर होणार अंमलबजावणी२८ जून रोजी शाळा सुरू करण्यात येतील. मात्र, ऑनलाईन की ऑफलाईन आणखी पत्र प्राप्त नाही. सद्यस्थितीत शाळा बंद आहेत. जिल्हा अनलॉकमध्ये असला तरी शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत शासनस्तरावरून निर्णय होईल, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, याची काळजी घेण्यात येईल. - सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा