शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेती व्यवसायाला कधी येणार ‘अच्छे दिन’: शेतकऱ्यांना प्रतीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:15 IST

Farmers News शेतकरी व शेती व्यवसायाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे दिसते. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वर्षभर शेतात राबराब राबायचे, थंडी, उन्हाची, विंचू-काट्याची तमा न बाळगता रात्रीचा दिवस करून कष्ट करायचे, निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न घ्यायचे, निसर्गाने अवकृपा केली तर आर्थिक भुर्दंड सोसायचा. निसर्ग साथ देत नाही व शासनही जवळ करीत नाही. मग, शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले खरे, पण शेतकरीशेती व्यवसायाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे दिसते. शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी दिल्यानंतर ‘अच्छे दिन’ येईल असे वाटले. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. सातबारावर कर्जाचा बोजा कायम असल्याने पुढील वर्षाकरिता कर्ज मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांकडून बँकेचे उंबरठे झिजवणे सुरू आहेत, तर सोयाबीन, कापसाला मिळणाऱ्या भावामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही. खरीप हंगामातील सुरुवातीची पीक परिस्थिती पाहता यावर्षी चांगले उत्पन्न होईल, असे वाटले. परंतु, खोडकिडी व परतीच्या पावसामुळे त्यात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. अतोनात खर्च करूनही शेतीत चांगले उत्पन्न घेण्यासाठी लागवडीला पैसाच राहत नाही. वर्षभराचा कुटुंबाचा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नाही. शेतमाल वगळता रासायिक खते, कीटकनाशकांसह इतर वस्तूंचे वाढते भावही शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडवित असल्याचे दिसते. शासनाने शेती व्यवसायाला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पांदण रस्ते अद्यापही उपेक्षित शेती खरेदी करून सरकार समद्धी मार्ग, मेट्रो, दोन पदरीचे चार पदरी रस्त्यावर कोट्यवधी नव्हे, अब्जावधी रुपये खर्च करीत आहे.  स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत, पण आजही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. शेतमाल पक्क्या रस्त्यावर कसा येणार, हा प्रश्नच आहे.

रात्रीचे ओलित जिवावर बेतणार  शासन भारनियमन मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा करीत आहे, पण शेतीला थ्री फेज वीपुरवठा आठवड्यातून तीन दिवस दिवसाला व चार दिवस रात्रीला दिला जातो.  रात्रीचे ओलित थंडीच्या दिवसांत शेतकरी कसे करणार, हे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कळत नसावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

दरवर्षीच जातेय हातचे पीक मळणीयोग्य पिके होतात आणि ऊन, वारा, पाऊस याचा धोका निर्माण होतो. कधी अतिवृष्टीने, कधी कोरड्या दुष्काळाने कधी गारपिटीने एवढेच नव्हे. तर रानडुक्कर, माकड, रोह्यांचा कळप पिके तुडवितात. हाती आलेले पीक जाते, पण शासन याचा बंदोबस्त करीत नाही. कुंपणासाठी अनुदानावर तारही देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती