शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विहिर खचली; ढिगाऱ्याखाली दबल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:45 IST

खामगाव:  विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्याने मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुले दबल्याची घटना खामगाव तालुक्यातील पोरज येथे  शनिवारी दुपारी घडली.

खामगाव:  विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्याने मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुले दबल्याची घटना खामगाव तालुक्यातील पोरज येथे  शनिवारी दुपारी घडली. यामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य तीन मुलांना मातीच्या ढीगाºयाखालून बाहेर काढण्यात यश आले असून, तीघांचीही प्रकृती गंभीर आहे.  तालुक्यातील पोरज येथे पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. या विहिरीची पाणी पातळी खोल गेल्याने उन्हाळ्यात खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना बाहेर काढण्यात आलेले साहित्य विहिरीनजीक टाकण्यात आले. दरम्यान, गत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे या विहिरीची पाणी पातळी वाढली. ही पाणी पातळी पाहणयासाठी काही मुले गेली होती.  अचानक विहीर १० ते १५ फूट खचली. यामध्ये यशवंत प्रमोद हेरोळे (१३), तुषार गोपाळ हेरोळे (१२), मुकुंद आत्मराम हेरोळे (८) व यश रामदास हेरोळे (११ ) ही चार बालके दाबल्या गेली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन व  गावकºयांनी तातडीने जेसीबी मशिनच्या सहाय्याने मातीचा भराव हटवून मुलांना बाहेर काढले. यामध्ये यशवंत प्रमोद हेरोळे या बालकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीघे गंभीर जखमी झाली असून, त्यांना उचारार्था रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात