शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लॉकडाउन असतानाही भरला जानेफळचा आठवडी बाजार; १९ व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:42 PM

नियमाचा भंग केल्याप्रकरणी १९ व्यापाऱ्यांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

जानेफळ (बुलडाणा) संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यत आला असून संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना जानेफळ येथे शनिवारी आठवडी बाजार भरला. नियमाचा भंग केल्याप्रकरणी १९ व्यापाऱ्यांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोना बाधितांच्या आकडा राज्यात दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे ५जण आढळलेले आहेत अशातच सर्वत्र घबराटीचे वातावरण बनलेले असल्याने संपूर्ण जिल्ह्याभरात गर्दी होणारे संपूर्ण ठिकाण बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊन तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेले आहेता. या पृष्ठभूमीवर जानेफळ येथे दर आठवड्याला भरणा?्या आठवडी बाजाराप्रमाणे व्यापाºयांनी आपली दुकाने थाटल्याने मोठी गर्दी होऊन गोंधळ उडाला होता. जानेफळ सह परिसरातील काही खेड्यातील महिला व नागरिक सुद्धा बाजारासाठी आल्याने झालेली मोठी गर्दी पाहून त्याचे फोटो व व्हिडिओ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा इतरांकडे एका सामाजिक कार्यकत्यार्ने पाठविल्याने त्याची दखल घेत उपरोक्त वरिष्ठांनी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी यांना त्वरित कार्यवाहीचे करण्याचे आदेश बजावल्याने उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या आदेशानुसार तलाठी विजेंद्र धोंडगे यांच्या तक्रारी वरुन १९ व्यापाºयांविरुद्ध कारवाई करण्यात आली.यांच्यावर झाली कारवाइशे.इमरान शे.रीयाज रा.सोनारगांव,शे.कादर शे.महमुलाल रा. जानेफळ,गजानन एकनाथ गुमटकर रा.जानेफळ,श्रीधर समाधान चांदणे रा.मुंदेफळ, गोपाल काळबांडे रा. मुंदेफळ, गणेश प्रभाकर रोकडे रा. जानेफळ, संजय कुंडलिक गोरे रा.जानेफळ, कैलास दौलत डवंगे रा.बोथा, अय्युब शाह महेबुब शाह रा. जानेफळ,संतोष करवंदे रा.जानेफळ,भानुदास हरीभाऊ मोसंबे रा.मो.वाडी,बाळु दगडूबा जाधव रा.जानेफळ, संतोष एकनाथ साळोक रा.जानेफळ,भारत आत्माराम खंडागळे रा.जानेफळ,शे.हूसेन तांबोळी रा.उटी, संतोष भास्कर दाभाडे रा.जानेफळ, शेख हसन शेख अब्दुल रा.उटी, गणेश पंजाब शेलार रा.जानेफळ, शेख फारुख शेख मजीद रा.जानेफळ या सर्वां विरुद्ध जमाव बंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून गर्दी जमा करणे तसेच शासनाच्या आदेशाचे पालन केले नसल्याबद्दल सदर कार्यवाही करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarketबाजार