शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:03 IST

Buldhana News दोन पंचायत समिती सभापती व चार ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीला देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचे वाढलेले संक्रमण तथा जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशानंतर, दोन पंचायत समिती सभापती व चार ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीला देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुका आता ३ मार्च रोजी घेण्यात येणार आहेत. या संदर्भात निवडणूक विभागाने आदेश निर्गमित केले आहे. आधीच्या निर्णयामुळे राजकारणातही लॉकडाऊनचा शिरकाव होतो की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच या निवडणुका ऑफलाइन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या दहा ते १२ दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे तीन हजारांच्या आसपास कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले होते. मिशन मोडवर प्रशासनाने जिल्ह्यात दहा दिवसांत दब्बल २१ हजार ६००पेक्षा अधिक संदिग्धांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या. वाढते संक्रमण पाहता, जळगाव जामोद व संग्रामपूर पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक, बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट, नांदुरा तालुक्यातील नारखेड, जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड आणि चिखली तालुक्यातील खैरव येथील सरंपचपदाची निवडणूक तात्पुरत्या स्वरूपात १ मार्च, २०२१ पर्यंत स्थगित केली होती. दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने या निवडणुका तीन मार्च रोजी घेण्याचे निर्देशित केले आहे. त्यामुळे अनेक राजकीय इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जळगाव जामोद व संग्रमापूर पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार होती. येथील दोन्ही सभापतींनी राजीनामे दिल्यामुळे तेथील सभापतीपद रिक्त झाले होते. तात्पुरत्या स्वरूपात पंचायत समितीचा कारभार तेथील उपसभापती पाहत होते. या व्यतिरिक्त तांत्रिक अडचणीमुळे बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट आणि नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक ही २६ फेब्रुवारीलाच होती. देऊळघाटमध्ये तर सुधारित अनुसूचित जाती संवर्गाचा एकच सदस्य असल्याने येथील निवडणूक केवळ एक अैापचारिकताच राहली होती. देऊळघाट येथे १७ सदस्यांसाठी ग्रामविकास पॅनल व सामाजिक एकता पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. यासोबतच नारखेड, वडगाव गड आणि खैरव येथील रिक्त राहलेल्या सरपंचपदाचीही निवडणूक तीन मार्च रोजीच घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.उंद्री व निमगाव पोटनिवडणुकीकडे लागले लक्षआता उंद्री व निमगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडेही राजकारण्यांचे लक्ष लागले असून, १० मार्च रोजी या दोन्ही गटांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूकही प्रसंगी मार्चअखेर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा मुकाबला होण्याची शक्यता आहे. उंद्री जि.प. गटाच्या सदस्य श्वेता महाले या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने, त्याने जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथील सदस्यत्व रिक्त आहे. निमगाव गटातून निवडून आलेले मधुकर वडोदे यांचे अकाली निधन झाल्यामुळे येथील सदस्यत्व रिक्त होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतpanchayat samitiपंचायत समितीsarpanchसरपंच