शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:34 IST

खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे.आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात.यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.

 

खामगाव:  बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे. याबाबत वारंवार आवाज उठविल्यानंतर मुख्यसचिव, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची  भेट घेवून त्यांना माहिती देण्यात आली त्यांच्याही चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की, १ ते १६ जानेवारीच्या कालावधीत मेहकर तालुक्यातील १४६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. त्यानंतर २१ ते २७ जानेवारी दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील ६६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. यामध्ये दूषीत पाणी पुरवठ्यामुळे तालुक्यातील ३००-४०० जणांचा किडनी आजाराने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये सोनाळा १००, कळमखेड ४०, वरवट खंडेराव ३०-४०  तर लाडणापूरमध्ये १०० जणांचा समावेश आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यामध्ये आरोग्य विषयक सुविधांचा अभाव असल्याचेही समोर आल्याचे माजी मंत्री सावजी यांनी नमूद केले. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून काही ठिकाणी पाईपलाईनचीही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार की नाही? याबाबत काही शाश्वती नाही. तथापि, या भागातील ४० गावांतील रस्त्यांचीही अतिशय दयनिय अवस्था झाली असून, या रस्त्याने मोटार सायकल चालविणेही  कठीण असल्याचेही सावजी यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन  समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, चंद्रकांत माने,  संजय तारापुरे, डॉ. अविनाश झाडोकार, अ‍ॅड. गायगोळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी