शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

खडकपूर्णाचे पाणी पेटले : २२ गावांमध्ये पाणी पुरवठा मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 19:19 IST

खडकपूर्णा धरणातून जालना जिल्ह्यातील मंठा व परतुर तालुक्यातील ९२ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

देऊळगाव राजा - खडकपूर्णा धरणातून जालना जिल्ह्यातील मंठा व परतुर तालुक्यातील ९२ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील २२ गावात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शनिवारी रात्री निषेधाच्या घोषणा देत दहन करण्यात आले. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात ठराव घेण्यात आले. या ठरावाला ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध दर्शविल्याने तालुक्यात खडकपूर्णाचे पाणी पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवर धरणाची निर्मिती झाली असून देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील गावांचा या पाण्यावर प्रथम हक्क आहे. परंतू पाण्यापासून तीच गावे वंचित असताना जालना जिल्ह्यात पाणी पळवल्या जात असल्याची बाब स्थानिक नागरिकांच्या पचनी पडली नाही, खडकपूर्णा पाणी बचाव संघर्ष समितीने गावागावात जाऊन जनजागृती केल्यानंतर जनभावना संतप्त झाल्या आणि त्याचाच परिणाम शनिवारी रात्री दिसून आला. तालुक्यातील देऊळगाव मही सिनगाव जहांगीर, खल्याळ गव्हाण, गारगुंडी, मेहुणा राजा, रोहणा, टाकरखेड भागीले, मंडपगाव, चिंचखेड, सुलतानपूर, गारखेड, पाडळी शिंदे, पांगरी माळी, निमगाव गुरू, वानेगाव, डिग्रस, पिंपळगाव सुरा यासह एकूण २२ गावात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे निषेधाच्या घोषणा देत दहन करण्यात आले.पुतळा दहणापूर्वी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा पार पडल्या. त्यामध्ये प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला विरोध दर्शवून ती रद्द करण्यात यावी, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातून योजनेची पाईपलाईन जाणार आहे, त्या वनजमिनीमधून प्रशासनाने परवानगी देऊ नये, असा ठराव सुद्धा एकमुखाने घेण्यात आला. तसेच योजना मंजूर झाल्यानंतर दिशाभूल करून ज्या ग्रामपंचायतींचे ठराव घेतले होते, त्या ग्रामपंचायतींनी सुद्धा दुस-यांदा ग्रामसभेत ठराव घेऊन प्रखर विरोध कायम ठेवला आहे.   आज ऐतिहासिक मोर्चासोमवारला देऊळगाव राजा शहरात याच प्रश्नावरती ऐतिहासिक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन विरुद्ध जनता असा थेट संघर्ष पेटण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या बुधवारी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे काम स्थनिकांनी बंद पाडल्यानंतर गुरुवारी पुन्हा ते काम सुरू केल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.  नियोजित विहिरीचे काम सुरूगुरूवारला सकाळी चार पोकलॅण्ड, पाच ते सहा ब्लास्टिंग ट्रॅक्टर व मजुरांच्या मदतीने खडकपूर्णा धरणपात्रातील नियोजित ठिकाणी विहीर खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या मतदार संघात असलेल्या ९२ गावांसाठी खडकपूर्णा धरणातून ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली व लगेच कंत्राटदाराला काम सुरू करण्यास सांगितले. धरणपात्रात चरी खोदुन विहिरीच्या खोलीकरणाचे काम देखील युध्द पातळीवर सुरू केले.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरbuldhanaबुलडाणा