खामगावातील ‘पाणी बाणी’ कायमच;  विविध भागातील पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:20 PM2019-03-29T12:20:20+5:302019-03-29T12:20:34+5:30

खामगाव :  धरणावरील जॅकवेलमध्ये पाण्याच्या जलसंचयाची समस्या कायम असतानाच, गुरूवारी पहाटे बुस्टर पंपावरील ८५ एचपीचा पंप नादुरूस्त झाला.

Water supply disrupt in different areas of Khamgaon | खामगावातील ‘पाणी बाणी’ कायमच;  विविध भागातील पाणी पुरवठा ठप्प

खामगावातील ‘पाणी बाणी’ कायमच;  विविध भागातील पाणी पुरवठा ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

खामगाव :  धरणावरील जॅकवेलमध्ये पाण्याच्या जलसंचयाची समस्या कायम असतानाच, गुरूवारी पहाटे बुस्टर पंपावरील ८५ एचपीचा पंप नादुरूस्त झाला. त्यामुळे आधीच विस्कळीत असलेला पाणी पुरवठा लांबणीवर पडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि पालिका प्रशासनामधील असमन्वय शहरातील पाणी टंचाईस कारणीभूत असल्याचे दिसून येते.

गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणावरून खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, धरणातील पाणी पातळी खोल गेल्याने, धरणावरील जॅकवेलमध्ये अपेक्षीत जलसाठा उपलब्ध होत नाही. परिणामी, गेल्या महिनाभरापासून खामगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशातच, पाणी पुरवठ्याचे वितरण असणाºया वामन नगरातील बुस्टर पंपावरील ८५ एचपीचा पंप गुरूवारी निकामी झाला. त्यामुळे शहराच्या विविध भागातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. बुस्टर पंपावर ‘स्टॅन्ड बाय’ पंप नसल्याने, नादुरूस्त झालेला पंप दुरूस्त होईपर्यंत अथवा दुसरा पंप येईपर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या कायम राहणार असल्याचे दिसून येते.

 

जानेवारीत नादुरूस्त पंपाची दुरूस्ती प्रलंबित!

वामन नगरातील बुस्टर पंपावर कार्यान्वित असलेला एक पंप २७ जानेवारी रोजी नादुरूस्त झाला होता. त्यावेळी दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला होता. अखेर २९ जानेवारी रोजी चिखली येथून एक पर्यायी पंप आणल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला. मात्र, तेव्हापासून नादुरूस्त असलेल्या पंपाची अद्यापपर्यंत दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यानंतर आता दुसरा पंपही निकामी झाला. ‘स्टॅन्ड’बाय पंप नसल्यामुळे वारंवार पाणी पुरवठा प्रभावित होतो. परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडून नेहमीच चालढकल वृत्तीने कामकाज केल्या जात आहे.


जॅकवेलवरील अत्यल्प जलसाठ्याची समस्याही कायमच!

गेरू माटरगाव येथील धरणावरील जॅकवेलची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. अपेक्षीत पाणी उचलण्यासाठी धरणातून इतर पंपांच्या साहाय्याने तसेच काही सायफन सिस्टिमच्या मदतीने धरणात पाणी घेण्यात येत आहे. मात्र, पाणी पातळी आणि जॅकवेलमधील अंतर जास्त असल्याने, याठिकाणी कार्यान्वित उप योजनेचे पंप सातत्याने नादुरूस्त होत आहे. (हीटींगमुळे पंप आणि केबल जळण्याची समस्या उद्भवत आहे.) त्यामुळेही शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे.

जुगाड तंत्रज्ञानाने पाणी पुरवठा!

बुस्टर पंप जळाल्यानंतर घाटपुरी टाकीवरून पाणी पुरवठा करण्यात आला. मढी, सुटाळपुरा, गांधी ले-आऊट या भागात पाणी पोहोचविण्यात आले. मात्र, बुस्टर पंपावरून पाणी पुरवठा होणाºया भागातील पाणी पुरवठा प्रभावित राहणार असल्याचे, पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.  

Web Title: Water supply disrupt in different areas of Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.