शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्पांचा जलसाठा शंभर टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:38 IST

जिल्ह्यातील पलढग, ज्ञानगंगा आणि मस हे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात आतापर्यंत ५३७.६ मिमी सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पाऊस झाला आहे. गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जलसाठ्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पलढग, ज्ञानगंगा आणि मस हे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील एकूण ९१ प्रकल्पांमध्ये २२३.९२ दलघमी साठा आहे.पावसाळ््याच्या तीन महिने उलटल्यांतर संग्रामपूर, बुलडाणा, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र मराठवाड्यालगतच्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात मात्र अपेक्षीत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील स्थिती अजूनही चिंताजनक आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने सिंदखेड राजा तालुक्यात १२.७ मिमी, मेहकर १०.८, चिखली तालुक्यात ४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५३७.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची टक्केवारी ही ८०.४९ टक्के आहे. संग्रामपूर तालुक्यात ११४.४७ टक्के, मलकापूर ९७.९० टक्के, शेगाव ९६.७७, बुलडाणा तालुक्यात ९५.६८ टक्के, जळगाव जामोद तालुक्यात ९५.०१ टक्के, चिखली ७४.२७ टक्के, देऊळगाव राजा ५४ टक्के, सिंदखेड राजा ६७.३० टक्के, लोणार ५५.१३ टक्के, मेहकर ६०.८८ टक्के, खामगाव ७५.३० टक्के, नांदुरा ८७.३७ टक्के, मोताळा ७८.७१ टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत गतवर्षीच्या दुष्काळाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तुलनेने चांगला पाऊस पडला असला तरी मोठा पेनटाकळी प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांमध्ये अपेक्षीत असा जलसाठा झालेला दिसत नाही. मध्यम प्रकल्पांपैकी पलढग, ज्ञानगंगा आणि मस हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मात्र नळगंगा व खडकपूर्णा हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये ३२ टक्के जलसाठाजिल्ह्यात एकूण ९२ प्रकल्प आहेत. त्यापैकी मोठे प्रकल्प तीन, मध्यम प्रकल्प सात व लघू प्रकल्प ८१ आहेत. त्यापैकी मोठ्या तीन प्रकल्पांमध्ये सध्या ३२.४१ टक्के जलसाठा आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीनही मोठ्या प्रकल्पांचा सकल्पीत साठा २२२.६९ दलघमी असून सध्या १८.७२ दलघमी जलसाठा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरणRainपाऊस