शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:28 IST

मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील पाणीटंचाईचे निवारण करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते. खामगाव शहराला सध्या गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. यावर्षी मागील तीन महिन्यापासून खामगाव शहरातील विविध भागात १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रासून गेले आहेत. भर उन्हात पाण्यासाठी महिला, मुले हातपंपावर पाणी भरताना दिसतात. पालिका प्रशासनातर्फे शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुुरु आहे. मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप खामगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होवू शकला नाही. खामगाव शहरातील काही भागात पालिकेची नळयोजना सुद्धा पोहचू शकली नाही. ़अशा भागात शहरातील सामाजिक कायकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकरवर तहान भागवणे जिकरीचे झाले आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता. पंधरा दिवसानंतर आमच्या भागात पाणी पुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन तथा तोंडी सांगूनही अद्याप या भागातील पाणीपुरवठा सुरुळीत होवू शकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.कायमस्वरुपी उपाययोजनांची गरजपाणीटंचाईची ाीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या खामगाव व शेगाव तालुक्यातील ६४ गावांना दररोज टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरवर तहान भागत नसल्याने अनेक ठिकाणी खाजगी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. गत ३ वर्षापासून सातत्याने बुलढाणा जिल्ह्यात कमी पाऊस होत आहे. मागील वर्षी तर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला. यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरींना पुरेसे पाणी आले नाही. काही धरणात पाणी आले पण तेही कमी. खामगाव तालुक्यातील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. तालुक्यातील एक तलाव पुर्णत: भरला नव्हता. अनेक धरणात तर पूर्ण पावसाळ्यात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे तालुक्यात पावसाळ्यापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई